कृषी दुताकडून जनावरांचे लसीकरण

29

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.24ऑगस्ट):-चिमूर तालुक्यातील खुर्सापार येथे मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी सौरभ कुबडे यांनी ग्रामीण कृषी कार्यक्रमा अंतर्गत “जनावरांची काळजी” या विषयावर खुर्सापार येथील शेतक-यांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी पाऊस पडला की जनावरांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. त्यासाठी जनावरांचे लसीकरण करणे आवश्यक असल्याचे शेतक-यांना समजावून सांगितले. यामध्ये घटसर्प या जीवाणूजन्य, विषाणूजन्य रोगाचा प्रसार होवू नये म्हणून घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच गावातील जनावरांना लसीकरण करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. ए. ठाकरे, उपप्राचार्य एम. व्ही. कडू, प्रा. एस. पी. लोखंडे यांनी शेतक-यांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला येथील सरपंच प्रशांत कोल्हे, ग्रामसेवक विजय आत्राम तसेच गावातील अनेक नागरिकांची उपस्थिती होती.