चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना आजारामुळे एकाचा मृत्यू

15

🔺जिल्ह्यात आज (२४ ऑगस्ट) रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ४७ कोरोना बाधितांची नोंद

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.२४ऑगस्ट):- कोरोना आजार जिल्ह्यात दिवसेंदिवस कहर करत असून दिनाक २३ ऑगस्टला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास एकाचा कोरोना आजारामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. भद्रावती येथील डब्लू. सी. एल. कॉलोनीतील ५३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्याला कोरोना व्यतिरिक्त न्युमोनिया व इतर आजाराने ग्रस्त केले होते. त्याला २३ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दरम्यान ७.३० वाजता त्याचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात आज (२४ ऑगस्ट) रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ४७ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. आतापर्यंतचे बाधितांची संख्या १४९५ झाली असून आतापर्यंत बरे झालेले बाधित ९९८ आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १६ व्यक्तींचा कोरोना आजारामुळे मृत्यू झाला असून त्यातील तेलंगना येथील १ व बुलढाणा १ जिल्ह्यातील आहेत.