चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघ तर्फे गोंडपिपरी येथील जनता महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

21

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)
मो:-8698648634

गोंडपिपरी(दि.24ऑगस्ट):- तालुक्यातील प्रभावशाली व उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जनता महाविद्यालयात गोंडपिपरी तालुक्यात इयता 10 वी मध्ये टॉप 3 विद्यार्थ्यांचा सत्कार आज दि. 24/08/2020 ला करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघ तर्फे करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षा प्राचार्या- ए. एल.रामटेके मॅडम, प्रमुख पाहुणे म्हणून श्री.कोरडे सर, श्री. बांदुरकर सर, व श्री. पडाडे सर उपस्थित होते. दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन चद्रपुर येथे करून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील टॉप विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत होते मात्र कोरोनाच्या दहशतीमुळे या कार्यक्रमाचे आयोजन जनता महाविद्यालय गोंडपिपरी येथे घेण्यात आले.

गोंडपिपरी तालुक्यातील कु. वैष्णवी कोरडे ही 10 वी मध्ये तालुक्यातून प्रथम आली. प्रतिक दहागावकर हा विद्यार्थी विज्ञान विभागातून प्रथम आला. तसेच शुभम नागपुरे हा कला विभागातून प्रथम आला. अश्या तालुक्यातील टॉप 3 विद्यार्थ्यांचा सत्कार शिल्ड देऊन करण्यात आले. अशा सत्कार सोहळ्याने विद्यार्थ्यांना खूप प्रेरणा मिळेल. यांना पुढील वाटचालीत भरघोस यश मिळो असे कार्यक्रमाचे अध्यक्षा व महाविद्यालयाचे प्राचार्या रामटेके मॅडम यांनी सांगितले.