वरुड नगर परिषद कॉमप्लेक्स मध्ये घानिचे साम्राज्य

7

🔺युवासेना शहर प्रमुख शशिकांत खेरडे यांचा आरोप

✒️हेमंत कोंडे(वरुड प्रतिनिधी)मो:-7218747238

वरुड(दि.25ऑगस्ट):-गेल्या काही दिवसापासून प्रधानमंत्री मा.मोदी यांनी स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे.याचे पालन संपुर्ण भरतभर केल्या सुद्धा जात आहे .प्रतेक पातळीवर कचरा गाड्या सुद्धा ऊपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. परंतु वरुड येथिल नगर परिषद कॉमप्लेक्स मध्ये गंदगी असुन सुद्धा फवारनी करण्यात आली नसुन साफसफाई व्यस्थित रित्या करण्यात येत नाही.या कडे नगरपरिषद पुर्ण दुर्लक्ष करत आहे. तसेच वरुड येथे स्वच्छता आभियानाची धज्जा उडवीली जात आहे .हा वरुड नगरपरिषदेचा बेजबाबदार पणा आहे असा आरोप युवासेना शहर प्रमुख शशिकांत खेरडे यांनी केला आहे.
एकिकडे मा.मोदी म्हणतात की स्वच्छ भारत सुन्दर भारत आणि याला संपूर्ण जनता पाठिंबा देत असताना सुद्धा वरुड नगरपालिकने सुद्धा स्वच्छ भारत मिशन तयार केली असुन सुद्धा स्वच्छतेकडे वरुड नगरपरिषदेचे पुर्णपणे दुर्लक्ष झाले आहे असा आरोप सुद्धा युवासेना शहर प्रमुख शशीकांत खेरडे यांनी केला आहे.
जर नगरपरिषद स्वच्छ भारत मिशन तयार करत असेलतर ही कसली स्वच्छता? जर नगरपरिषद स्वच्छता पाळत नसेल तर वरुड वासी जनता कशी स्वच्छता पाळणार ?असा प्रश्न सुद्धा शशिकांत खेरडे यांनी उपस्थीत केला आहे.