

✒️सचिन महाजन(वर्धा प्रतिनिधी)मो:-9765486350
वर्धा(दि.25ऑगस्ट):- जिल्ह्यातील शासन मान्य कंप्यूटर टायपिंग आणि शॉर्ट हँड इंस्टीट्यूट हे 22 मार्च पासून कोरोना या महामारी मुळे बंद होते . त्यामुळे विद्यार्थ्याला नौकरी करिता लागणारे संगणक प्रमाणपत्रे मिळत नव्हते .अश्या अडचणीत काय करावे असा प्रश्न विद्यार्थ्यापुढे होता .विद्यार्थ्याची समस्या लक्षात घेता वर्धा जिल्हा संगणक टंकलेखन आणि शॉर्ट हँड इंस्टीट्यूट शासनमान्य संस्थाची संघटना वर्धेचे जिल्हा समन्वयक व महाराष्ट्र शासन मान्यता संगणक टायपिंग आणि शॉर्ट हँड शिक्षण संस्था संघटनेचे राज्य परीक्षा सहसचिव श्री .संजय खत्री , संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेश राजगुरे , जिल्हा सचिव संजय कावळे यांनी दि .26/06/2020 ला मा . जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन शासन मान्य कंप्यूटर टायपिंग आणि शॉर्ट हँड इंस्टीट्यूट सुरु करण्याबाबत पाठपुरावा केला. या अनुषंगाने मा .जिल्हाधिकारी साहेब वर्धा यांनी वर्धा जिल्ह्यातील शासन मान्य कंप्यूटर टायपिंग आणि शॉर्ट हँड इंस्टीट्यूट कोरोना काळात सामाजिक अंतर पाळत व या रोगाची योग्य काळजी घेऊन सुरु करण्यास 11/08/2020 पासून परवानगी दिली त्यामुळे आता विद्यार्थ्यास नौकरी साठी लागणारे प्रमाणपत्रे कोर्स करून मिळवता येईल हा दिलासा मिळाला. शासन मान्य कंप्यूटर टायपिंग आणि शॉर्ट हँड इंस्टीट्यूट सुरू करण्यास परवानगी दिल्याबद्दल व लोकप्रतिनिधीनी शिफारस पत्र पाठवून सहकार्य केल्याबद्दल वर्धा जिल्ह्याचे खाजदार रामदास तडस , वर्धा जिल्हा पालकमंत्री सुनील केदार , हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार , वर्धाचे आमदार पंकज भोयर , रामदास आंबटकर , आर्वीचे आमदार दादाराव केचे , माजी आमदार समीर देशमुख , वर्धाचे मा . जिल्हाधिकारी विवेक भिमनवार साहेब , निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे साहेब , वर्धा जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री .उल्हास नरड साहेब , सहायक शिक्षण विभाग सौ . उषा तळवेकर त्याचप्रमाणे विशेष सहकारी पूखराज मापारी , नारायण चव्हाण , अक्षय कावळे , प्रवीण पेटकर , जगताब साहेब, या सर्वच अधिकारी वर्गाचे वर्धा जिल्हा संगणक टंकलेखन आणि शॉर्ट हँड इंस्टीट्यूट शासनमान्य संस्थाची संघटना वर्धा कडून सर्वच पदाधिकारी ,अधिकारी आणि प्रत्येक्ष आणि अप्रतेक्ष सहकार्य करणाऱयांचे अभिनंदन करण्यात आले .