३१ अॉगस्ट रोजी चला विठूरायाच्या दर्शनाला – ज्ञानेश्वर कोठेकर

  42

  ?मंदिर प्रवेश आंदोलनाचे नेतृत्व ॲड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर करणार

  ✒️माजलगांव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  माजलगाव(दि.25ऑगस्ट ):-राज्यातील वारकरी संप्रदायाने लॉकडाऊन विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
  करोना संक्रमणामुळे गेल्या चार पाच महिन्यापासून बंद असलेले विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुली करण्यासाठी ३१अॉगस्ट रोजी विश्व वारकरी सेनेनं एक लाख वारकऱ्यांसोबत मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे करणार आहेत.
  करोना संसर्गामुळे गेल्या चार पाच महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे याचा फटका सर्वांना बसला आहे. राज्यात मिशन बिगिन अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले असेल तरी धार्मिक स्थळांना आणि सण- उत्सवांना तितकासा दिलासा मिळाला नाही. यंदा आषाढीवारी प्रतिकात्मकरित्या साजरी करण्यात आली. आषाढी याञेदिवशी पंढरपुरात वारकऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली होती, त्याशिवाय भजन किर्तनासही मनाई करण्यात आलेली आहे .या सगळ्याच मुद्यावरून वारकरी संप्रदाय नाराज आहे ,याच नाराजीच्या स्फोट म्हणून वारकऱ्यांनी एक लाख वारकरी घेऊन पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात प्रवेश करणार आहेत. या वारकऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठींबा मिळाल्याने वारकऱ्यांच्या लढ्याला अधिकच धार आली आहे.

  देशात आणि राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर इतिहासात प्रथमच भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते आता वारकऱ्यांना प्रदीर्घ कालावधी नंतर विठुभक्तांना आणि वारकऱ्यांन्या विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली आहे
  त्यामुळे विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष ह.भ.प.गणेश महाराज शेटे व विश्व वारकरी सेनेचे उपाध्यक्ष ह.भ.प. जगन्नाथ महाराज तसेच इतर वारकरी संंघटनानी येत्या ३१अॉगस्ट २०२० रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक लाख वारकऱ्यांन्या सोबत घेऊन मंदिर प्रवेश करणार आहे. तरी बीड जिल्ह्यातील सर्व वारकऱ्यांनी भजनी मंडळानी तसेच पायीवारी करणाऱ्यानी व सर्व भाविक भक्तांनी या आंदोलनास पंढरपूर येथे ३१अॉगस्ट२०२० रोजी सकाळी ११:०० वाजता उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हासंघटक ज्ञानेश्वर कोठेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकातून केले आहे.