शेतातील उभे पिक नष्ट करून व त्यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा

  103

  ?भारत मुक्ती मोर्चा न्याय न मिळाल्यास राज्यभर आंदोलन करणार

  ?पत्रकार परिषदेत दिली माहिती-भद्रावती तालुक्यातील प्रकार

  ✒️चंद्रपूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

  चंद्रपूर(25 ऑगस्ट ):-वसंत वारलू दडमल हे गेल्या पंधरा वर्षापासून सरकारी पडीत जमीनीवर ६ एकर त्यांच्या ताब्यातील शेतावर शेती करीत आहे. व तसेच गावातील ईतर ३० ते ४० शेतकरी सुध्दा या प्रमाणे सरकारी पडीत जमीनीवर शेती करित आहेत. वसंत वारलू दडमल व त्यांच्या कुटुंबीयाकडे जिवन निर्वाह करण्यासाठी दुसरे साधन नसल्यामुळे, सध्या सरकारी पडीत जमिनीवर शेती करून जिवन-निर्वाह करीत आहे व त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करित आहे.
  दि. १४ ऑगस्ट रोजी गावातील गावगुंड नामे यशवंत गजानन नन्नावरे, राह, तुकूम, चंद्रपूर, किष्णराव आत्माराम नन्नावरे, तुकूम, चंद्रपूर, रवि आडकु नन्नावरे, गंजवार्ड, चंद्रपूर, मनोज आनंदराव नन्नावरे, तुकूम, चंद्रपूर, तुळशीराम विठू कारमेंगे, राह. मुधोली, ता.भद्रावती, जि. चंद्रपूर, रविन्द्र विठ्ठल घोडमारे, राह. कोंडेगाव, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर, विठ्ठल वासुदेव धरत, राह, कोंडेगाव, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर, राजकुमार तानबा गायकवाड, राह. मुधोली, ता.भद्रावती, जि. चंद्रपूर, बबन नारायण भोयर, राह. कोंडेगाव, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर या लोकांना शेतात येवून धानाचे उभ्या पिकावर नांगर व वखर या साधनांचा वापर करून उध्दवस्त केले आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. सदरील गावगुंड यांना राजकिय पक्षाचे पाठबळ असून, त्यांच्या विरूध्द लेखी तकार पोलीस स्टेशन, भद्रावतीला दिली. परंतू पोलीसांनी आजपर्यंत त्यांच्याविरूध्द कोणतीही कार्यवाही केली नाही
  तसेच दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता पून्हा त्याच गावगुंडानी नामे यशवंत गजानन नन्नावरे, राह. तुकूम, चंद्रपूर, कृष्णराव आत्माराम नन्नावरे, तुकूम, चंद्रपूर, तुळशीराम विठू कारमेंगे, राह. मुधोली, ता.भद्रावती, जि. चंद्रपूर तसेच त्यांच्या सोबत आणलेल्या स्त्रिया नामे पंचफ्ला मानिक हनवले, अजूबार कारमेये, पुमा दिनकर घोडमारे, कलाबाई सर्यभान मानकर, कु साक्षी दिनकर बोडमारे, नानेबाई अरुण कारमेधे, जयश्री दिनकर कारमेघे, गिता विठ्ठल धरत, जोत्सना विकास जांभुळे, तुळसाबाई सर्यभान गजभे या महिलांना वसंत वारलू दडमल यांच्या शेतात आणून शेतीवर बळजबरीने काम करून शेतात पेरणी केली. वसंत वारलू दडमल यांनी रोखण्याचा प्रयत्न जर केले तर त्यांना खोटे गुन्हयात फसविण्याचे षडयंत्र करण्यात आले आहे. या षड़यत्रामध्ये गावातील सरपंच नामे रविंद्र विठ्ठल घोडमारे हा सुध्दा त्यामध्ये सामील आहे. वसंत वास्तू दडमल सदर घटेनची तकार (लेखि) देण्यास दि.१४ ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन भद्रावती येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता त्यांची लेखी तक्रारी नूसार, तक्रार न होता चूकीच्या पध्दतीने बयान घेवून सदर घटनेची पोलीसांनी NCR दाखल केली आहे. पोलीसांनी सुध्या सदर घटनेच गांभीर्य लक्षात न घेता सदर गावगुंडाना पाठीशी घालत आहे. पाठीशी घालण्याचे काम केलेले आहे त्यामुळे वसंत वारलू दडमल यांच्यावर मानसिक, शारिरीक व आर्थिक अत्याचार गावगंडांनी केले आहे व त्यांच्या शेतीवर बळजबरीने कब्जा करण्याचा सदर च्या गावगुंडांचा हेतू असून, त्यामुळे त्यांच्या जिवाला व त्यांच्या कुटुंबाच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. म्हणून भारत मुक्ती मोर्चाची मागणी आहे की, त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे., सदर घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करण्यात यावी., यांना शेतीचे नुकसान भरपाई म्हणून ५ लाख रूपये देण्यात यावे., न्याय सुध्दा देण्यात यावा., सदर घटनेची दखल घेवून वरील नमूद गावगुंडाविरूध्र FIR दर्ज करण्यात यावा. वरील मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रातील सर्व जिल्हयात आंदोलन करण्यात येईल.