चंद्रपूर जिल्ह्यात आज (दि.25ऑगस्ट) रोजी कोरोना आजारामुळे एकाचा मृत्यू

  44

  ?जिल्ह्यात आज (सायंकाळी 6 वाजेपर्यंत) 24 तासात 76 कोरोना बाधीत

  ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  चंद्रपूर(दि.25ऑगस्ट):-जिल्ह्यात आज सकाळी 8.05 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 72 वर्षीय पुरुषांचा मृत्यू झाला.मृतक हा चंद्रपूर येथील पठाणपुरा वार्डातील असून त्याला 22 ऑगस्टला दुपारी 3.35 वाजता भर्ती करण्यात आले होते.उपचारादरम्यान आज त्यांचे निधन झाले.

  आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात कोरोना बाधितांची संख्या 76 झाली आहे.जिल्ह्यात आता पर्यंतचे कोरोना बाधितांची संख्या 1571 झाली आहे.

  आज नवीन बधितांन बाबत सविस्तर माहिती असलेले वृत्त काही तासात देण्यात येईल.