✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

खटाव(दि.25ऑगस्ट):- इंडोनेशिया देशाने घेतलेल्याऑनलाईन “पिंच्याक सिल्याट” स्पर्धेत जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील दरूज येथील बाल खेळाडू श्रवण सचिन लावंड याने सहभाग घेऊन नेत्रदीपक कामगिरी करत घवघवीत यश मिळवल्याने त्याचे क्रीडा क्षेत्रातुन कौतुक होत आहे.
जगात सर्वत्र कोरोना व लॉकडाऊन सुरु असल्याने क्रीडा क्षेत्रातही कमालीची शांतता पसरली असून खेळाडूमध्ये प्रोस्थान व सातत्य राहण्यासाठी इंडोनेशिया पिंच्याक सिल्याट फेडरेशन तर्फे ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत जगातील विविध देशातील ४०० खेळाडूनी व भारतीय संघातून विविध वयोगटातील खेळाडूने सहभाग घेतला होता या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील श्रवण लावंड खेळाडूने चमकदार कामगिरी करत (कांस्य ) पदकाची कमाई केली पिंच्याक सिल्याट हा खेळ इंडोनेशिया मार्शल आर्ट खेळाचा प्रकार असून तो स्टँडिंग(फाईट) तुंगल(सिंगल)रेग्यु(ट्रिपल)व गंडा(डबल)या चार प्रकारात खेळला जातो हा खेळ युवती महिला विध्यार्थी विध्यार्थ्यांनी यांच्यात स्वसवरक्षणासाठी लोकप्रिय होत आहे.

याला युवक कल्याण मंत्रालय भारत सरकारभारतीय विश्वविद्यालय संघ ऑलम्पिक कौन्सिल ऑफ एशियाची मान्यता आहे याचा शालेय खेळात समावेश होत आहे विजयी खेळाडूना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व महाराष्ट्र पिंच्याक सिल्याटअसोसिएशनचे महासचिव किशोर येवले आकाश धबागडे नागेश बनसोडे अनुज सरनाईक यांचे मार्गदर्शन लाभले सातारा जिल्हा पिंच्याक सिल्याटचे अध्यक्ष निसार शेख उपाध्यक्ष संतोष चौधरी सचिव संजीव वरे खजिनदार दीपाली येवले सदस्य संदीप महागडे चंद्रकांत कायनगुडे जकीरा शेख व खेळाच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

मनोरंजन, महाराष्ट्र, राष्ट्रीय, सांस्कृतिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED