✒️अंबड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अंबड(दि.26ऑगस्ट):-अंबड जिल्हा जालना येथील भागवत एकनाथ गावंडे यांची राष्ट्रीय जनपरिषद पार्टी जालना जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
राष्ट्रीय जनपरिषद पक्षाच्यावतीने गावंडे यांचे संघटनात्मक उत्कृष्ट कार्य बघता त्यांची दिनांक 23 ऑगस्ट रोजी जिल्हा जालना विभागाच्या जिल्हाध्यक्ष या पदी नियुक्ती पुढील तीन वर्षांकरिता करण्यात आली.

पक्ष मजबूती करण्यासाठी पक्षाचे ध्येयधोरण सर्वसामान्यांपर्यंत पोचण्यासाठी सहकार्य राहील असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
गावंडे यांची निवड राष्ट्रीय जनपरिषद पार्टी चे संस्थापक अध्यक्ष अतुल भाऊ पाटील प्रदेशाध्यक्ष शंकर पारेकर व महासचिव आनंदराव पाटील यांनी नियुक्त पत्र देऊन केली आहे.

या नियुक्ती बद्दल भागवत गावंडे यांचे सर्व जिल्हा स्तरातून अभिनंदन होत आहे या नियुक्तीबद्दल त्यांचे सोलापूर चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भंडारे,शहराध्यक्ष सोलापूर किरण वाघमोडे, जिल्हा उपाध्यक्ष पोपट घुले, प्रसिद्धी प्रमुख मच्छिंद्र भांडेकर, बार्शी तालुकाध्यक्ष
संतोष पवार, अकलकोट तालुकाध्यक्ष चौडाप्पा कुंभार,माढा तालुकाध्यक्ष प्रमोद धर्म,पंढरपूर तालुकाध्यक्ष अनिल कुंभार,द. सोलापूर तालुकाध्यक्ष विकास दसाडे,शहराध्यक्ष कुडूवाडी नागनाथ बागल, संघटक यकिन शेख, सह संघटक सत्तार सरदार शेख,विभाग प्रमुख रमेश जगताप व सभांजीनगर (औरंगाबाद )चे जिल्हाध्यक्ष मनोजकुमार आठवले आदींनी स्वागत व अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Breaking News

©️ALL RIGHT RESERVED