🔺बैल पौळ्याच्या दिवशी बैल गावात का आणले म्हणून चौघांची दादागिरी

✒️नवनाथ पौळ(केज,विशेष प्रतिनिधी)
मो:-8080942185

केज(दि.26ऑगस्ट):-बैल पौळ्याच्या दिवशी गावात बैल का आणले? या कारणावरून केज तालुक्यातील तुकूचीवाडी येथील ३५ वर्षीय इसमास गुप्तांगाच्या नाजूक जागी धारदार चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.
दि- १९ आॅगस्ट रोजी नामदेव पंढरी चौरे वय (३५ वर्षे )यांस अशोक संपत्ती चौरे, बालासाहेब रघुनाथ चौरे,महिपती रघुनाथ चौरे, अंकुश रामराव चौरे हे त्यांच्या घरासमोर जाऊन म्हणाले की तु गावात तुझे बैल बैल पोळ्याच्या दिवशी का मिरवायला आणले ? या कारणावरून शिवीगाळ केली. त्यावेळी अशोक संपत्ती चौरे याने गचुरे धरून चाकू काढून मांडीवर वार करून गुप्त भागाच्या नाजूक भागी भोसकून गंभीर जखमी केले.अंकूश रामराव चौरे याने अशोक संपत्ती चौरे याच्या हातातील चाकू घेऊन त्यांच्या कंबरेला मारून जखमी केले व महिपती चौरे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.तसूच तुमच्याकडे बघुन घेऊ अशी धमकीही दिली.
या प्रकरणी केज पोलिसांना एमएलसी व वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यावरून नामदेव पंढरी चौरे यांच्या फिर्यादीवरून अंकूश रामराव चौरे, बालासाहेब रघुनाथ चौरे , महिपती रघुनाथ चौरे,अशोक संपत्ती चौरे या चौघांविरुद्ध केज पोलीस स्टेशनला गु.र.नं.३२१/२०२० भा.दं.वि.३२६,३२४,३२३,५०४,५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळकृष्ण मुंडे हे अधिक तपास करत आहेत.

Breaking News, क्राईम खबर , महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED