लहान मुलीला ताब्यात देण्यावरुन कुऱ्हाडीने मारहाण

35

🔺जिवे मारण्याचा प्रयत्न अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)
मो:-8080942185

केेेज(दि.26ऑगस्ट):-लहान मुलीचा ताबा देण्यावरुन केज तालुक्यातील एकास कुह्राडीने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ची माहिती अशी की पाच वर्षांपूर्वी तालुक्यातील टाकळी येथे सविता गोविंद घुले हिचा नवरा गोविंद घुले याने आत्महत्या केलेली आहे त्यांना पाच वर्षे वयाची मुलगी आहे नवरा वारल्यापासून सविता ही तिच्या माहेरी च चिखलबीड येथे रहात असून मुलगी श्रावणी गोविंद घुले वय ५ वर्ष ही तिच्या आजी-आजोबा यांच्या कडे मौजे टाकळी ता- केज येथे रहात आहे.
दरम्यान दि- दि २२ आॅगस्ट २०२० रोजी चिखलबीड येथील सोमीनाथ अण्णा तोगे, नंदुबाई सोमिनाथ तोगे, सविता गोविंद घुले, हनुमंत सोमिनाथ तोगे,बाळु अण्णा तोगे,सुरेखा बाळु तोगे, अविनाश बाळू तोगे,सुदामती नारायण तोगे, नारायण अश्रुभा तोगे, गणेश भारत डोरले, भारत लक्ष्मण डोरले हे सर्वजण बोलेरो जिपने ( एमएच २४/ इफ २५६० ) ने सुमारे११:०० केज तालुक्यातील टाकळी येथे आले व हे सर्वजण घुले यांच्या घरासमोर जाऊन सोमिनाथ तोगे हा सुंदरराव घुले यांना म्हाणाला की आम्ही आमची नात ( श्रावणी) स घेऊन जायला आलो आहोत,तीला घेऊन जाणार आहोत असे तो म्हणाला तेंव्हा सुंदरराव घुले ( श्रावणी आजोबा टाकळी) हे म्हणाले की, श्रावणी आमच्याकडे च रहाणार आहे असे ठरलेले आहे तेव्हा आरोपी सोमनाथ तोगे यांनी सुंदरराव घुले यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने हातातील कुह्राड त्यांच्या डाव्या डोळ्याच्या वर कपाळावर मारून जखमी केले.सुंदरराव घुले यांच्या पत्नी,मुलगा व सुन यांना दगड ,विटा मारुन जखमी केले आहे.
सुंदरराव घुले यांनी दि-२५ आॅगस्ट रोजी केज पोलीस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीनुसार चिखलबीड येथील अकरा जणांविरुद्ध केज पोलीस स्टेशनला गु.र.नं.३२३/२०२० भा.दं.वि.३०७,३२६,३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४८ आणि १४९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास हे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे करत आहेत.