रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांची संमती न घेता पुनर्घटन झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यात यावी: भुमिपुत्र शेतकरी संघटना

27

✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)
मो:-8308862587

सेनगाव(दि.26ऑगस्ट):-रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांची संमती न घेता पुनर्घटन झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यात यावी अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था रिसोड यांना निवेदन देऊन करण्यात आली. रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांची संमती न घेता पुनर्गठन झाल्यामुळे शासनाच्या कर्ज माफीपासुन वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्वरित नवीन कर्ज देण्यात यावे व रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांची संमती न घेता पुनर्घटन करणाऱ्या सेवा सहकारी संस्थांच्या सदर प्रकरणी चौकशी करून सेवा सहकारी संस्था वर योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.खरिपातील पिक हातात येण्याची वेळ निर्माण झाली असताना अजूनही शेतकऱ्यांना कर्जासाठी पात्र असूनही कर्जमाफी पासून वंचित आहेत.यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवी पाटील जाधव यांच्या समवेत बालाजी बिल्लारी, शंकर गिरे, विष्णू सरकटे,गणेश सरकटे, शुभम मस्के व भूमिपुत्र संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.