आडात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

    110

    ✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:- 9075913114

    गेवराई(दि.26ऑगस्ट):-वडवणी तालुक्यातील बाहेगव्हण येथील गावात जवळील सार्वजनिक आडात पोहण्यासाठी गेलेल्या दोन्ही 10 वर्षीय मुलांचा सार्वजनिक आडामध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दुपारी एक वाजता बाहेगव्हण येथे घडली.
    सदरील मुलांचा मृतदेह बाहेर काढुन उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल केले असता डॉक्टरांनी मुलांना मृत घोषित केले. लखन महादेव पोटभरे (वय १० वर्षे) व रोहन रामेश्वर मस्के (वय १० वर्षे) असे मृत बालकांचे नाव आहे. या दोन्ही बालकांचा बाहेगव्हण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला या दुर्दैवी घटनेने बाहेगव्हण येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.