सोनाराच्या दुकानावर महिला चोरट्यांचा डल्ला

35

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.26ऑगस्ट):-परळी शहरातील अत्यंत गजबजलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील अरुण अँड सन्स ह्या सोने-चांदीच्या दुकानी तोंडाला स्टोन बांधून अज्ञात महिलांनी जवळपास दोन लाखांचे सोने लंपास केले. विशेष म्हणजे श्रीगणेश आणि महालक्ष्मीच्या पार्श्वभूमीवर सदर चौकात पोलिस बंदोबस्त तैनात होता. ही घटना दिवसा ढवळ्या घडल्याने सोने-चांदी व्यापार्यांत घबराट निर्माण झाली आहे. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती. सणाच्या पार्श्वभूमीवर गर्दीचा गैरफायदा घेत सोने चांदीच्या दुकानी गेली आणि दिवसांपासून काही अज्ञात महिला डल्ला मारण्याचा इराद्याने बाजारात फिरत असल्याची बातमी शहरांमध्ये फिरत होती. मात्र फिरत असलेली बातमी आज सत्यत्तेच्या स्वरूपात समोर आली.

घडलेली घटना:-

काही अज्ञात महिला तोंडास स्टोन बांधून ह्या दुकानी सोने खरेदीच्या बहाण्याने आल्या आणि त्यांनी दुकानातील नौकरांना गंठण दाखवण्याची मागणी केली. नोकरांनी सोन्याचे विविध प्रकारचे गंठनही दाखवले.
मात्र अरुण टाक यांचे नोकरवर्ग सदर महिलांना विविध प्रकारचे गंठण दाखविण्यात व्यस्त असतानाच त्याचा गैरफायदा घेत नोकरांच्या डोळ्यात धूळ फेकल्यागत तोंडावर स्टोन बांधलेल्या त्या महिलांनी एकूण चार तोळे वजन असलेले दोन गंठण ज्यांची अंदाजे किंमत दोन लाख रुपयाची आहे दिवसा ढवळ्या लांबवले.