

🔹विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.26ऑगस्ट):- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयांतर्गत दिनांक 28 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांकरिता करिअर कॉन्सलिंग, मार्गदर्शन कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने अर्थात वेबिनारच्या माध्यमातून होणार आहे. वेबीनारमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे असणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक नॅशनल करिअर सर्वीस, श्रम व रोजगार मंत्रालयाचे डॉ.अनिल जाधव राहतील.
सदर दिवशी इच्छुक युवक/युवतींना कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता गुगल मिट अॅप तसेच http://meet.google.com/oxe-syze-rxx या लिंकचा उपयोग करावे. जेणेकरुन दिनांक 28 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 12 वाजता ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होता येईल. अधिक माहिती करिता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर या कार्यालयाचे 07172-252295 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कार्यालयाचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.