मूर्ती न विकल्याने उपासमारीची वेळ

27

✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

खटाव(दि.27ऑगस्ट):-कोरोनाच्या जागतिक महामारी ने कहर केला असून ,हातावरचे पोट असणारे, वर्षभर काम करून त्याचा मोबदला एका दिवसात मिळवण्यासाठी धडपड करणारे, गणेश मूर्तिकार यांना यावर्षी मूर्ती न खप झाल्याने कर्जबाजारीपणा व उपासमारीची वेळ आली आहे.
पारंपारिक ,सामाजिक परंपरा असलेले कुंभार समाजाचे मूर्तिकार व अन्य कलाकार यांचे वार्षिक आर्थिक घडी बसवण्याचे काम गणेशमूर्तींच्या विक्रीत होत असते. परंतु यंदा कोरूना मुळे जिल्हा बंदी टाळेबंदी यामुळे अर्थचक्र पूर्ण थांबले व गणेश मूर्तींची मागणी घटल्यामुळे कुंभार समाज व कलाकारांचे आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडले असून उपासमार व कर्जबाजारीपणा होण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.
प्रतिवर्षी गणेश मूर्तीचे काम करणारे त्याच्यावर आपला प्रपंच चालवणारे मूर्तिकार यंदाही मूर्ती बनवल्या परंतु कोरोनामुळे त्याचा आर्थिक तोटा होणार आहे. हे माहित असताना देखील , गणेशोस्तव हा पारंपरिक सण-उत्सव असल्यामुळे, मूर्ती या आशेने प्रतिवर्षी पेक्षा निम्मे मुर्त्या करून देखील त्यातील निम्मे मुर्त्या राहिल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आले आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक या व्यवसायात होते मजूर, रंगकाम, पीओपी, माती या सर्व विकत लागत असल्यामुळे पैशांची देवाण-घेवाण थंडावली .त्यामुळे मूर्तिकार आर्थिक पेचात सापडले आहेत यावर शासनाने मूर्तिकाम व माती काम करणाऱ्या कलाकारांना कुंभार समाजाला आर्थिक मदत देण्याचे विनंती कुंभार समाजाच्या मार्फत केली जात आहे.
महाराष्ट्रातून मूर्ती परदेशात देखील जातात परंतु शासनाच्या पीओपी संदर्भातील धोरण समजत नसल्याने, मूर्तिकार मूर्ती कराव्यात की नाहीत या संभ्रमात राहत आहेत. कष्ट करणारा समाजावर शासनाने अशी कोणतेही निर्बंध देखील घालू नयेत ,अन्यथा जे हात कष्ट करायला गुंतलेले आहेत त्यांना काम होणार नाही .पर्यायाने पुन्हा बेरोजगारी ला सामोरे जावे लागेल त्यामुळे मूर्ति कामाला शासनाने प्राधान्य देणे, त्यांना बिनव्याजी कर्ज योजना अर्थसहाय्य मिळण्यासाठी सहकार्य करून कुंभार समाजातील लोक जे पारंपरिक मातीची मूर्तीचे काम करत आहेत त्यांना शासनातर्फे महिन्याची पेन्शन योजना जाहीर करावी, ही देखील मागणी समाजामार्फत होत आहे.