
🔸कृषी सहाय्यक श्री. पी.पी.पेन्दोर यांचे आवाहन
✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)
मो:-८६९८६४८६३४
गोंडपिपरी(दि.27ऑगस्ट):- तालुक्यातील भंगाराम तळोधी भागातील शेतकऱ्यांनी शेतीतील पिकांची फवारणी करताना काही काळजी पूर्वक व योग्य त्या औषधांची फवारणी करावी, असे आव्हान गोंडपिपरी तालुक्याचे कृषी सहाय्यक श्री. पी.पी.पेन्दोर साहेब, यांनी केले आहे. किटकनाशकाची फवारणी करताना कपाशीवर कीड/रोग जसे- १) तुडतुडे, फुलकिडे, मावा लागल्यास, यावर औषधी:- फ्लोनीकॅमिड ५० डब्लूजी, याचे प्रमाण: २ ग्रॅम/10 लि.पाणी. किंवा बुफ्रोफेन्झीन २५ एससी, याचे प्रमाण: २० मिली/10 लि.पाणी किंवा डायफेन्थूरॅान ५० डब्लूपी, याचे प्रमाण: १२ ग्रॅम/10 लि.पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल, याचे प्रमाण: ३ मिली/10 लि.पाणी किंवा फिप्रोनील ५ एससी, याचे प्रमाण: ३० मिली/10 लि.पाणी किंवा ऑसिफेट ७५ एससी, याचे प्रमाण: ८ ग्रॅम/ 10 लि.पाणी.
२)पांढरी माशी यावर औषधी:- डायफेन्थूरॅान ५० डब्लूपी, याचे प्रमाण: १२ ग्रॅम/10 लि.पाणी किंवा बुफ्रोफेन्झीन २५ एससी, याचे प्रमाण: २० मिली/10 लि.पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल, याचे प्रमाण: ३ मिली/10 लि.पाणी किंवा ऑसिफेट ७५ एससी, याचे प्रमाण: २० ग्रॅम/ 10 लि.पाणी किंवा फ्लोनीकॅमिड ५० डब्लूजी, याचे प्रमाण: २ ग्रॅम/10 लि.पाणी किंवा पायरीप्रोक्झीफेन 10 ईसी, याचे प्रमाण: २० मिली/10 लि.पाणी
३)बोंड अळी:- यामध्ये शेंदरी बोंड अळी, ठिपक्यांची बोंड अळी व अमेरिकन बोंड अळी असे प्रकार असतात. यावर औषधी:- प्रोफेनोफॅास 10 ईसी, याचे प्रमाण: ३० मिली/10 लि.पाणी किंवा थायोडीकार्बे ७५ डब्लूपी, याचे प्रमाण: २० ग्रॅम/10 लि.पाणी किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ एससी, याचे प्रमाण: ४ ग्रॅम/10 लि.पाणी किंवा स्पिनोसँड ४५ एससी, याचे प्रमाण: ४ मिली/10 लि.पाणी किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल १८.५ एससी, याचे प्रमाण: ३ मिली/10 लि.पाणी किंवा फ्लुबेंडामाईड २० डब्लूजी, याचे प्रमाण: ५ ग्रॅम/10 लि.पाणी किंवा फ्लुबेंडामाईड ३९.३५ एससी, याचे प्रमाण: २.५ मिली/10 लि.पाणी किंवा नोव्हाल्यूरॉन 10 ईसी, याचे प्रमाण: २० मिली/10 लि.पाणी घ्यावे.
४)लाल्या:- यावर अ)पाण्याचा जमिनीतून योग्य निचरा करून जमीन वापसा स्थितीमध्ये ठेवणे. ब)डवरणी करावी. क)मॅग्नेशीयम सल्फेटची फवारणी करावी. ड)पानावरील रस शोषण करणाऱ्या कीटकांचे(तुडतुडे, फुलकिडे) योग्य व्यवस्थापन करणे. (ईमिडाक्लोप्रीड १७.८ एसएल ३ मिली/10 लि.पाणी) घ्यावे.
वरील प्रमाण हे साध्या पंपासाठी असून पॉवर स्प्रे पंपाकरिता प्रमाण तिप्पट करावे. तसेच किटकनाशकाची फवारणी करतांना फवारणी कीट किंवा तोंडाला रुमाल व अंगावर पूर्ण कपडे घालून फवारणी करावी. व आपल्या आरोग्याची किटकनाशकाच्या होणाऱ्या दुष्परीनामापासून काळजी घ्यावी. याबाबत शेतकरी बंधूंना कृषी सहाय्यक श्री. पी.पी. पेन्दोर यांनी आव्हान केले आहे.