बीड जिल्हा असंघटित कामगार काँग्रेसच्यावतीने पंतप्रधान यांना पत्र मोहीम

14

✒️ देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595

गेवराई(दि.२७आॅगस्ट):- अखिल भारतीय असंघटित कामगार काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद सिंग व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व मो. बदरूज्जमा यांच्या आदेशानुसार 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान पंतप्रधान यांना असंघटित कामगार, फेरीवाले, रिक्षावाले, बांधकाम कामगार, छोटे व्यापारी, शेतमजूर इत्यादी शेकडो बांधवांनी पत्र लिहून संबंधित मागण्याचे पत्र पोस्टात टाकण्यात आले. या कामगारांचे लाॅक डाऊन मुळे प्रचंड हाल झाले असून कित्येक कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. या सर्व परिस्थितीची जाणीव मा. पंतप्रधानांना व्हावी म्हणून पाठवण्यात आलेल्या पत्रात केलेल्या मागण्या अशा आहेत. १) कामगारांचे जीवन वाचवावे २) सर्व असंघटित कामगारांचे रजिस्ट्रेशन नोंदणी अनिवार्य करावी ३) सर्व कामगारांच्या बचत खात्यात तात्काळ नगद पैसे पाठवावेत ४) सर्वांना मोफत राशन देण्यात यावे या मागण्या पत्राद्वारे करण्यात आलेल्या आहेत. या वेळी गेवराई पोस्ट ऑफिस जवळील पोस्ट पेटीत असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संतोष निकाळजे, युवक काँग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष श्रीनिवास बेदरे, प्रदेश सेवादलाचे राज्य सचिव कडूदास कांबळे व असंघटित कामगार काँग्रेस प्रदेश सचिव मधुकर वादे इत्यादी उपस्थित होते.