✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

सातारा(दि.27ऑगस्ट):-अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांसाठी व समाजाच्या हितासाठी कार्यरत आहे, विद्यार्थ्यांच्या हितासाठी कोरोना च्या जागतिक महामारी मध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफी साठी धुळे येथे पालकमंत्र्यांचा ताफा अडवल्याबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या अमानवीय कृत्याचा अभाविप सातारा तर्फे निषेध करण्यात आला व जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा संयोजक गौरी वाघ व जिल्हा सहसंयोजक आर्यन पोळ व इतर विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED