महाराष्ट्राचे पाणी राज्याबाहेर जाऊ न देण्याचा ना. भुजबळ यांच्या धाडसी निर्णयाचे जाहीर स्वागत – नवनाथआबा वाघमारे

6

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

जालना(दि.27ऑगस्ट):- गेल्या काही वर्षापासून गोदावरी खोऱ्याचे पाणी अन्य राज्याच्या प्रकल्पांना देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यामुळे पाण्यापासून महाराष्ट्रातील अनेक भाग वंचित राहात आले आहेत आणि वंचित राहीले असते व तसेच हक्काच्या पाण्याविना राज्यातील अनेक जिल्ह्याची तहान भागवत भागत नव्हती त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील एक थेंब ही पाणी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ न देता त्याचा फायदा मराठवाड्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांना देणार असल्याची धाडसी भूमिका महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगनरावजी भुजबळ यांच्या भूमिकेचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष नवनाथआबा वाघमारे यांनी जाहीर स्वागत केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काळमुस्ते योजना शिवारातील डोंगरगाव या गावाजवळील दमणगंगा खोऱ्यातील वाल नदीच्या स्थानिक नाल्यावर प्रवाहित आहे त्या पाण्यात गोदावरी व तापी खोऱ्यातील उपलब्ध पाण्याचा पूर्णपणे वापर झाला असल्याने शासनाने औरंगा, अंबिका, नारमार, उल्हास व वैतरणा खोऱ्यातील नद्यांचे पाणी अरबी समुद्रात वाहून जात होते. परंतु ते पाणी गोदावरी व तापी खोऱ्यात वळविण्यासाठी अभ्यास समिती स्थापन करून अहवाल सादर करण्यात आला होता. ना. छगनरावजी भुजबळ यांच्या या निर्णयामुळे राज्यातील मराठवाड्यासह इतर भागांना आपल्या हक्काचे पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

आतापर्यंत घरचे उपाशी आणि शेजारचे तुपाशी अशी केविलवाणी अवस्था झाली होती परंतु ना. छगनरावजी भुजबळ यांच्या धाडशी भूमिकेमुळे मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्हे सुजलाम-सुफलाम नक्कीच होतील असा विश्वास व्यक्त करुन ना. छगनरावजी भुजबळ यांच्या भूमिकेचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष नवनाथआबा वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष राधाकिसन माने, सुधाकर घेर, राजेंद्र दारुंटे, सुंदरराव कुदळे, युवक जिल्हाध्यक्ष डॉक्टर विशाल धानुरे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मंगेश वाघमारे, तालुकाध्यक्ष विलास शिंदे, रवींद्र उखर्डे, सुनील बनकर, बद्रीनाथ गाढवे, मधुकर झरेकर, गोरख हिरे, ज्ञानेश्वर खरात, रंगनाथ उकंडे, शुभम जाधव आदींनी ना. भुजबळ यांच्या या धाडसी भूमिकेचे जाहीर स्वागत केले आहे.