कोरोना पार्श्वभुमीवर जिल्हा कारागृहातील उर्स यात्रा रद्द

30

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.27ऑगस्ट):-सद्यस्थितीत कोरोना महामारीचा सर्वत्र प्रसार होत असल्याने राज्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंध कायद्यान्वये सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली व उच्च न्यायालय मुंबईच्या आदेशान्वये कारागृहातील कैद्यांना कोरोनाच्या संसर्गापासून मुक्त ठेवण्यासाठी निर्देश देण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हा कारागृह येथे दरवर्षी होणारा मोहरम महिन्याच्या नवमी व दशमीला दि. 29 ऑगस्ट व 30 ऑगस्ट रोजी ऊर्सचे आयोजन होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी कारागृह परिसरात येऊ नये,असे आवाहन चंद्रपूर जिल्हा कारागृह वर्ग-1चे अधीक्षक वैभव आगे यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्हा कारागृहातील बंदी बांधवांना तसेच अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये. याकरिता यावर्षी मुस्लिम हिजरी सणानिमित्त मोहरम महिन्याच्या नवमी व दशमीला दि. 29 व 30 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या आतील परिसरात असलेल्या पुज्य हजरत मखदुम शहाबुद्दीन शहा उर्फ गैबीशहा वली दर्ग्यावर ऊर्स यात्रा भरविण्यात येणार नसून सदरची यात्रा ही यावर्षी स्थगित करण्यात आलेली आहे.