सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक जमनादास गुप्ता यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त भजन संध्या कार्यक्रमाची भावपूर्ण वातावरणात सांगता

32

🔸गरजू लोकांसाठी आय आर डी ए चे परीक्षा शुल्क एम जे असोसिएट्स व इन्व्हेस्ट तर्फे भरण्याची घोषणा

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.27ऑगस्ट):- सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक जमनादास गुप्ता यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त भजन संध्या कार्यक्रमाचे पुण्यातील औंध रोड येथे जमुना अपार्टमेंट मध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वामी हिमांशू, श्याम गोरान व सहकलाकारांनी भजन सादर केले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीमुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तसेच फिजिकल डिस्टंसिंग चे नियम पाळून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी एमजे असोसिएटचे संचालक मनिराम जमनादास गुप्ता, इन्व्हेस्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक गोकुळ महाजन, इन्वेस्ट इंडियाचे इव्हेंट मॅनेजर महेंद्र अग्रवाल, सुपर प्रिंटर चे संचालक चांडी मामन, जमनादास गुप्ता यांच्या पत्नी श्रीमती शांतीदेवी गुप्ता, विमलादेवी गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.
जमनादास गुप्ता यांनी गरीब व गरजू लोकांना आयुष्यभर विविध मार्गांनी मदत करण्याचे ध्येय बाळगले होते. त्यांची अंतिम इच्छा होती की मनीराम गुप्ता यांनी गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करावी, म्हणून या स्मृती दिनाच्या निमित्त मनिराम गुप्ता यांनी इन्शुरन्स मार्केटिंग च्या परीक्षेसाठी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीमुळे सर्व उत्पन्न स्रोत बंद असलेल्या गरजू लोकांसाठी आय आर डी ए चे परीक्षा शुल्क एम जे असोसिएट्स व इन्व्हेस्ट तर्फे भरण्याचे इंडिया तर्फे भरण्याची घोषणा केली या परीक्षेसाठी mjgupta0106@gmail.com, investindia@gmail.com या मेलवर 30 सप्टेंबर 2020 पर्यंत इन्शुरन्स मार्केटिंग चे अर्ज गरजू व्यक्ती पाठवू शकतील.

गरजू व्यक्तींनी मनीराम गुप्‍ता, प्रशांत निकम माध्यम समन्वयक (श्रावी मीडिया)मो:9372584452 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.