ईगल फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्रीय गुणगौरव सोहळ्याचे आयोजन

16

🔹पुरस्कार प्रस्ताव व्हॉटसअपवर पाठवण्याची सुसंधी

🔸विविध क्षेत्रातील व्यक्तींना ३० ऑगस्टपूर्वी पुरस्कार प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

🔹५ सप्टेंबर रोजी गौरवमुर्तीची नावे होणार जाहीर

✒️अंगद दराडे(बीड, जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.28ऑगस्ट):-सामाजिक, वैद्यकीय, सहकार,युवा,महिला, पत्रकार (प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया व वेब मिडीया) , शैक्षणिक,महिला ,शेती, प्रशासकीय , सांस्कृतिक,साहित्यिक, कलावंत आदी क्षेत्रातील व्यक्ती तसेच संस्थांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने ईगल फौंडेशनच्या वतीने गौरविण्यात येणार आहे. दि. ५ सप्टेंबर २०२० रोजी या गौरवमुर्तींची नावे जाहीर करण्यात येणार आहेत.ज्यांना आपला प्रस्ताव पाठवायचा असेल त्यांनी दि. ३० ऑगस्ट २०२० पुर्वी पाठवावेत.
ईगल फौंडेशन या सेवाभावी व नोंदणीकृत संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय व राष्ट्रीयपातळीवर विशेष काम करणा-या व्यक्ती , संस्थेला आकर्षक मानपत्र ,सन्मानचिन्ह, शाल ,श्रीफळ, देवून दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवण्यात येणार आहे. इच्छुकांनी संस्थेचा प्रस्ताव फॉर्म मागणी केल्यास, व्हॉट्सअपवर पाठवला जाईल.पुरस्कार प्रस्ताव व्हाट्सअपवर विहीत नमुन्यातच स्विकारला जाईल.माहिती पाठवताना कमीत कमी फोटो व जास्तीत जास्त नामांकन फॉर्मवरील मुद्यानुसार माहिती पाठवावी.
असे आवाहन ईगल फाऊंडेशन च्यावतीने अध्यक्ष श्री विलासराव कोळेकर, उपाध्यक्ष श्री सागर पाटील , सचिव श्री शेखर सुर्यवंशी प्रमुख पदाधिकारी श्री बाबासाहेब राशिनकर, श्री प्रकाश वंजोळे, श्री सुभाष भोसले,प्रा.तुकाराम पाटील , प्रा.स्मिता गिरी,श्री संजय नवले,प्रा.महेशकुमार मोटे,प्रा.सर्जेराव राऊत, श्री अशोक शिंदे,श्री राजेश जोष्टे आदींनी केले आहे.अधिक माहितीसाठी 9922452635 /9422420611 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.