वैदिक बेड्यातून संतांची मुक्ती ही प्रतिक्रांती करणाऱ्याच्या छाताडावर लाथच होय !

21

मनुवाद्यांनी हिंदुधर्माच्या नावाखाली इथली परिवर्तनवादी, पुरोगामी, बहुजनांची संत परंपरा जवळ-जवळ नायनाट करून, वैदिक हिंदू धर्म अंधश्रध्दाच्या माध्यमातून इथल्या बहुजनांच्या मस्तकावर बसवला आहे. उदा. तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवणे.
इथला वारकरी संप्रदाय,संत परंपरा ही वैदिक धर्माच्या पूर्णपणे वेगळी आहे. यांची तुलनाच करायची झाली तर अशी, की वारकरी संप्रदाय, संत परंपरा ही पुरोगामी विचारांची वाहक आहे, तर वैदिक धर्म हा सनातनी विचारांचा वाहक आहे. वैदिक धर्मवाले या संत परंपरेला हिंदूंच्या नावाखाली हायजॅक करून त्यांच्या प्रतिक्रांतीच्या रस्त्यात येणाऱ्या शक्तींना कमोजर करत आहेत.

आपल्या पुरोगामी महाराष्ट्राची खूप मोठी एक शोकांतिका आहे, ती अशी की, महाराष्ट्रात आम्ही पुरोगामी म्हणून उर बडवणारे पक्ष- काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन पक्षाने सत्ता उपभोगून देखील वारकरी संप्रदाय, संत परंपरा व वैदिक धर्म या दोन विचार धारा पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत हे इथल्या बहुजनाला सांगण्याचं व दाखवण्याचं परिवर्तनवादी काम कधी तथाकथित पुरोगामी पक्षांनी सत्तेच्या जोरावर केलं नाही.

या उलट हातात सत्ता नसताना देखील आद. बाळासाहेब आंबेडकर हे वारकरी संप्रदायाची व संत परंपरेची जी एक स्वातंत्र विचारधारा आहे, तिला तिचं वैदिक धर्माच्या खाली दडलेलं अस्तित्व पुन्हा मिळवून देण्यासाठी पूर्वी पासूनच झटत आहेत, त्याचाच भाग म्हणून पंढरपूरला ३१ ऑगस्ट ला १ लाख वारकऱ्यांच्या सोबत विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी आंदोलन छेडलं आहे. आद. बाळासाहेब आंबेडकरांनी वारकऱ्यांच्या पाठी उभा राहून,पंढरपूरचे विठ्ठल मंदिर उघडं करण्याचा हा जो लढा उभा केला आहे तो परिवर्तनवादी क्रांती चा भागच आहे. या साठी पुरोगामी:- विचारवन्त, लेखक, साहित्यिक, पत्रकार या सर्वांनी आपआपल्या माध्यमातून बाळासाहेबांच्या या लढ्याला बळकटी द्यायला हवी. कारण वैदिक बेड्यातून संतांची मुक्ती ही प्रतिक्रांती करणाऱ्याच्या छाताडावर लाथच होय!

✒️लेखक:-(संदीप साळवे, जालना)
मो:-८६९१९५५२०२

🔹संकलन:-नवनाथ पौळ(केज तालुका प्रतिनिधी)
मो:-8080942185