🔺अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील घटना

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

अंबाजोगाई(दि.28ऑगस्ट):-सासऱ्यानेच सुनेच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे घडली. आरोपी सासऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार शीतल अजय लव्हारे (वय २५) मयत महिलेचे नाव आहे. गुरुवारी (दि.27) रात्री साडेनऊच्या सुमारास तिचा सासरा बालासाहेब संभाजी लव्हारे याने कुऱ्हाडीने तिच्यावर गळ्यावर वार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात शीतलचा जागीच मृत्यू झाला. तर, शीतलची सासू देखील या घटनेत जखमी झाल्याचे समजते. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी मध्यरात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, हल्ल्यानंतर सासरा फरार झाला होता. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांनी दिली.

क्राईम खबर , बीड, महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED