

🔸आठवडी बाजार पूर्वरत सुरू करण्याची मागणी
✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चिमूर(दि.28ऑगस्ट):-नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या गुजरी बाजाराचा लिलाव झाला नसताना सुद्धा एक जुना लिलावधारक बाजारपेठ मधील भाजी व इतर दुकानदारा कडून चिट्टी च्या नावाखाली वसुली करीत असून याकडे नप प्रशासनाचा आशीर्वाद असल्याचा आरोप करीत अवैध चिट्टी वसुली कसा करतो असा गंभीर सवाल कांग्रेस चे युवा नेते पप्पू शेख यांनी करीत आठवडी बाजार पूर्वरत शुक्रवार ला सुरु करण्याची मागणी सुद्धा केली.
नगर परिषद च्या माध्यमातून दर दिवशीचा व आठवडी बाजार चा चिट्टी लिलाव करून संबंधित परवानाधारक लिलावधारक ठेकेदारास दिला जातो परंतु दरम्यान कोरोना कोविड मुळे लॉकडाउन सुरू झाले आठवडी बाजार बंद करण्यात आले गुजरी पण बंद करण्यात आली तेव्हा मार्च एप्रिल महिन्याच्या दरम्यान नवीन लिलावधारक निवडल्या जात असतो परंतु कोरोना मुळे लिलाव काढल्या गेला नाही तेव्हा जुना लिलावधारक भाजी व इतर दुकानदाराकडून चिट्टी च्या नावाखाली चिट्टी वसुली करतो कसा असा प्रश्न निर्माण झाला असून नगर परिषद शासन प्रशासनाचे दुर्लक्ष कसे असा संशय असून याकडे गुप्त आशीर्वाद असल्याचा आरोप करीत अवैध चिट्टी वसुली ची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी कांग्रेस चे युवा नेते शेख पप्पु यांनी करीत नियमित आठवडी बाजार सुद्धा पूर्वरत सुरू करण्याची मागणी केली आहे.