शेतकऱ्यानी धान पिकांवर फवारणी करतांना दिलेल्या किटकनाशकाच्या मात्राप्रमाणे वापर करावा

7

🔸कृषी सहाय्यक पी.पी. पेंदोर यांचे काळजीपूर्वक आवाहन

✒️नितीन रामटेके(गोंडपीपरी, तालुका प्रतिनिधी)
मो:-8698648634

गोंडपिपरी(दि.28ऑगस्ट):- तालुक्यातील भंगाराम तळोधी भागातील शेतकऱ्यांनी शेतीतील पिकांची फवारणी करताना काही काळजी पूर्वक व योग्य त्या औषधांची फवारणी करावी, असे आव्हान गोंडपिपरी तालुक्याचे कृषी सहाय्यक श्री. पी.पी.पेन्दोर साहेब, यांनी केले आहे. किटकनाशकाची फवारणी करताना धानावर कीड/रोग जसे-
१)लष्करी अळी, यावर औषधी:- डायक्लोरोव्हॉस 76% ईसी, याचे प्रमाण: 12.5 मिली/10 लि.पाणी. किंवा कार्बारील 50% डब्लूपी, याचे प्रमाण: 20 ग्रॅम/10 लि.पाणी.
2) खोडकीडा किंवा गादमाशी यावर औषधी:- क्वीनॅालफॅास 25% ईसी, याचे प्रमाण: 26 मिली/10 लि.पाणी. किंवा कारटॅप हायड्रोक्लोराईड 50% एसपी, याचे प्रमाण: 20 ग्रॅम/10 लि.पाणी. किंवा कार्बोफ्युरॉन 3 जी, याचे प्रमाण: 25 कि.ग्रॅम/हेक्टर. किंवा इमामेक्टीन बेंझोएट 5 एससी, याचे प्रमाण: 4 ग्रॅम/10 लि.पाणी. किंवा फिप्रोनील 0.3 जी, याचे प्रमाण: 25 कि.ग्रॅम/हेक्टर.
३)पाने गुंडाळणारी अळी यावर औषधी:- क्वीनॅालफॅास 25% ईसी, याचे प्रमाण: 26 मिली/10 लि.पाणी. किंवा क्लोरपायरीफॉस 20% ईसी, , याचे प्रमाण: 26 मिली/10 लि.पाणी. किंवा ट्रायझोफॉस 40% ईसी, , याचे प्रमाण: 20 मिली/10 लि.पाणी.
४)तपकिरी तुडतुडे, यावर औषधी:- डायक्लोरोव्हॅास 76 ईसी, याचे प्रमाण: 12.5 मिली/10 लि.पाणी. किंवा बुफ्रोफेन्झीन 25% एससी, याचे प्रमाण: 16 मिली/10 लि.पाणी. किंवा इमिडाक्लोप्रिड 17.7 एसएल, याचे प्रमाण: 20 मिली/10 लि.पाणी. थायोमिथाक्झाम 25 डब्लूजी, याचे प्रमाण: 3 ग्रॅम/10 लि.पाणी. फिप्रोनील 5 एससी, याचे प्रमाण: 10 ग्रॅम/10 लि.पाणी. किंवा ऑसिफेट 75 एससी, याचे प्रमाण: 400-800 ग्रॅम/ हेक्टर
५)करपा/पर्णकोष करपा यावर औषधी:- कार्बेन्डेझिम 50 डब्लुपी, याचे प्रमाण: 7 ग्रॅम/10 लि.पाणी. ट्रायसायक्लोझोल 75 एसपी, याचे प्रमाण: 10 मिली/10 लि.पाणी. प्रोपीकोनॅझोल 25 ईसी, याचे प्रमाण: 20 मिली/10 लि.पाणी. हेक्झाकोनॅझोल 5 ईसी, याचे प्रमाण: 25 मिली/10 लि.पाणी. किंवा व्हॅलीडामासीन 3 एसएल, याचे प्रमाण: 25 ग्रॅम/10 लि.पाणी.
6)कडाकरपा यावर औषधी:- कॅापर ऑक्झीक्लोराईड 50 डब्लूपी, याचे प्रमाण: 25 ग्रॅम/10 लि.पाणी. स्ट्रेप्टोसायक्लीन, याचे प्रमाण: 0.5 ग्रॅम/10 लि.पाणी. इत्यादी घ्यावे.
वरील रासायनिक किटकनाशकची फवारणी टाळायची असल्यास दशपर्णी अर्क 200 मी.लि/ 15 लि. पाणी, 5% निंबोळी अर्क याची फवारणी करावी. रासायनिक किटकनाशकचा संतुलित वापर करावा.तसेच किटकनाशकाची फवारणी करतांना फवारणी कीट किंवा तोंडाला रुमाल, अंगावर औप्रान सारख्या पूर्ण कपडे घालून फवारणी करावी. व आपल्या आरोग्याची किटकनाशकाच्या होणाऱ्या दुष्परीनामापासून काळजी घ्यावी. याबाबत शेतकरी बंधूंना कृषी सहाय्यक श्री. पी.पी. पेन्दोर यांनी आव्हान केले आहे. वरील प्रमाण हे साध्या पंपासाठी असून पॉवर स्प्रे पंपाकरिता प्रमाण तिप्पट करावे.