

✒️धुळे(पुरोगामी संदेश नेटवर्क)
धुळे(दि.28ऑगस्ट):- विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यावर अमानुष मारहाण प्रकरणी आज दि.28/8/2020 बेरोजगार भूमिहीन मजूर व असंघटित कामगार संघ चे जिल्हाध्यक्ष नवनीत बागले व त्यांच्या पदाधिकारी यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड साहेब यांना निवेदन देऊन सदर घटनेची तात्काळ चौकशी होऊन सदर पोलीस कर्मचारी यांना निलंबित न करता बडतर्फ करण्यात यावे असं आशयाचे निवेदन देण्यात आले. सदर विध्यार्थी चे परीक्षा शुल्क माफ करावे, महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या दिलासा द्यावा ,विद्यार्थी यांच्या कडून घेतलेले परीक्षा शुल्क माफ करावे, असे आशयाचे निवेदन बेरोजगार भूमिहीन मजूर संघ च्या वतीने देण्यात आले व सदर निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष नवनीत बागले,उपाध्यक्ष ऋषिकेश पाटील, ओंकार पगारे(जिल्हासरचिटणीस)मनोज माळी(ता. अध्यक्ष धुळे )भुषण भदाणे(ता. उपाध्यक्ष धुळे)राजेंद्र चौधरी(माळी)शिंदखेडा ता. अध्यक्ष)अशोक तिरमले (शिंदखेडा ता. सल्लागार)राजेंद्र पानपाटील(ता. उपाध्यक्ष शिंदखेडा)समाधान पाटील(ता. ग्रामीण अध्यक्ष)धुडकू रामराजे (सदस्य)आदी उपस्थित होते.