भारत प्रभात पार्टीच्या वतीने अधिकाऱ्यांनचा केला सत्कार

20

✒️सातारा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सातारा(दि.29ऑगस्ट):-स्वच्छ सर्वेक्षण’२०२० यामध्ये सलग दुसऱ्यांदा कराड नगरपलिकेचा प्रथम क्रमांक पटकाविल्याने मुख्य प्रशासकीय अधिकारी, सीइओ भालदार, नगरपालिका स्टाफ तसेच सर्व कर्मचारी यांचे भारत प्रभात पार्टी’तर्फे शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले.
पुढील वर्षी सुद्धा क्रमांक मिळवून हॅटट्रिक’ची संधी मिळणार कारण कराड हे शहर स्वच्छता बाबतीत नावलौकिक आहे आणि राहणार असल्याचे समजले जमतेतून गतवर्षी व यावर्षी नगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकाविल्याने पुढीलवर्षीही प्रथम क्रमांक मिळवावा. अर्थात, हॅटट्रिक साधली जाईल.अशाही शुभेच्छा अनेकांनी या वेळी दिल्या आहेत.
यावेळी राज्य महासचिव सौ.आस्मा मुल्ला, जिल्हाध्यक्ष अजय वीर,शिवाजी कुंभार, जिल्हा सचिव निलम सुर्वे,तालुका अध्यक्ष मेजर ए पी पवार,तालुका उपाध्यक्ष काजल माने बनवडी अध्यक्ष मेजर बीचकर,शहराध्यक्ष अमोल सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.