🔸आप चा यशस्वी दिल्ली पँटर्न आता चिमूर विधानसभेत

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.29ऑगस्ट):-कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावावर योग्य वेळी आढा बसावा म्हणून दिल्ली येथील आम आदमी पार्टी सरकार द्वारे घेण्यात आलेल्या अनेक उपाय-योजनेतील सर्वात लोकप्रिय व प्रभावी ठरलेला उपाय म्हणजे ऑक्सिमीटर द्वारे ऑक्सिजन ची तपासणी करून रुग्णाला योग्य वेळी आरोग्य व्यवस्था मिळवून देने. जगभर गाजलेला हा प्रभावी प्रयोग आता आम आदमी पार्टी चिमूर विधानसभेत सुरुवात करीत आहे.

ग्रामीण भागात होत असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे जनमानसात भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. अश्या परिस्थितीत, अपुऱ्या साधन-सामुग्री व कमी मनुष्यबळा मुळे सरकारी व्यवस्था किती प्रभावीपणे काम करू शकते यावर अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. कोरोनाच्या या परिस्थितीला आढा बसावा म्हणून आम आदमी पार्टी चे स्वयंसेवक पुढे सरसावले आहेत.

प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात चिमूर विधानसभेत यशस्वी दिल्ली प्याटर्ण आधारित ऑक्सिमीटर द्वारे घरोघरी ऑक्सिजन ची तपासणी करण्यात येनार आहे. कमी ऑक्सिजन असलेल्या रुग्णांना त्वरित आवश्यक आरोग्य व्यवस्था मिळवून देण्यासाठी मदत करण्यात येईल. यासाठी आम आदमी पार्टीच्या स्वयंसेवकांना ऑक्सिमीटर सुपूर्द करण्यात आले असून ऑक्सिमीटर द्वारे घरोघरी ऑक्सिजन ची तपासणी कशी करायची व कोणत्या खरबरदारी घ्याव्या यावर प्रशिक्षण देन्यात आले. प्रायोगिक तत्वावर चिमूर तालुक्यातील सोनेगाव येथे ३५० लोकांची ऑक्सिमीटर द्वारे ऑक्सिजन ची तपासणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे लोकांच्या मनात असलेली भीती कमी होऊन रुग्णाला योग्य वेळेस मदत मिळण्यास हातभार लागेल.

लवकरच हे अभियान चिमूर-नागभीड विधानसभेतील जास्तीत जास्त गावात लागू करण्यात येत आहे. यासाठी आम आदमी पार्टी चे स्वयंसेवक ‘ऑक्सिमित्र’ म्हणून घरोघरी येणार आहेत. या उपक्रमासाठी सुरेशजी कोल्हे, आदित्य पिसे, मंगेश शेंडे, विशाल इंदोरकर, सुशांत इंदोरकर, कैलास भोयर, मंगेश वांढरे, त्रिलोक बघमारे, नरेश बुटके, शिगाल पाटील, संजय बहादुरे, विशाल बारस्कर, लीलाधार लिचडे, देवानंद गायधनी, अरवींद समर्थ, संतोष इखार, मोरेश्वर बाम्बोडे, पवन पिसे, सविता हजारे, समिधा भैसारे, अर्चना लोहकरे व ईतर स्वयंसेवकांची ‘ऑक्सिमित्र’ म्हणून नेमणूक झालेली आहे. इच्छुकांनी आपल्या भागातील ऑक्सिमित्र बनण्यासाठी आम आदमी पार्टीच्या स्वयंसेवकांकडे संपर्क साधावा असे आप तर्फे सांगण्यात आले.

महाराष्ट्र, विदर्भ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED