✒️आष्टी (पुरोगामी संदेश नेटवर्क)

आष्टी (दि.२९ऑगस्ट):-माजी मंत्री तथा आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि अल्पसख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष मुस्ताक अब्दुल गनी शेख यांनी आष्टी शहर अध्यक्ष पदावर मोहमद निसार मोहमद इसाक यांची नियुक्ती केली.
यावेळी राष्र्टवादि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर, श्रीकांत ओलालवर तालुका अध्यक्ष चामोर्शी, ऋषिकांत पापडकर जिल्हअध्यक्ष रायुकॉं, संजीव गोसावी, स्वामी चुक्कावार तालुका सचिव राष्ट्रवादी कँग्रेस, नेमाजी गोगरे तालुका अध्यक्ष रायुकॉं, राहुल डांगे शहर अध्यक्ष रायुकॉं, संतोष डहाळे राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष, पायल नामेवर राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष, राकेश दंडीकवार तालुका अध्यक्ष रायुकाँ, शबाज शेख, शहर सचिव विंदेश काणेकर, शहर कोषाध्यक्ष हंसराज दुर्गे,शहर सहसचिव रज्जत निमसरकार उपस्थित होते. मोहमद निसार मोहमद इसाक यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि अल्पसख्याक विभागाचे आष्टी शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या चाहत्यांनी अभिनंदन केले.

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED