✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587

सेनगाव(दि.29ऑगस्ट):-रिसोड ते वाशिम रस्त्याचे नूतनीकरण सुरू असताना कंत्राटदाराकडून काम अचानक बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. बंद पडलेले काम तात्काळ सुरू करावे यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वाखाली 3 सप्टेंबर गुरुवार रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने रिसोड ते वाशिम ये-जा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जिल्हा मुख्यालयाला जोडलेल्या प्रमुख रस्त्याचे काम बंद पडल्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे रखडलेल्या रस्त्यांचे काम पूर्ववत सुरू करावे, खोदून पडलेल्या रस्त्यांकडे कंत्राटदार व सामाजिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे यांची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी व काम चालू असताना पर्यायी मार्ग व्यवस्थित करून देण्याची जबाबदारी निश्चित करण्यात यावी या मागण्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराच्या विरोधात भुमिपुत्र शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे. आंदोलनासाठी जिल्हाध्यक्ष रामेश्वर आवचार, युवक जिल्हाध्यक्ष राम पाटील बोरकर, रिसोड तालुका अध्यक्ष श्रीरंग नागरे, वाशिम तालुकाध्यक्ष संतोष सुर्वे, मालेगाव तालुका अध्यक्ष नागेश इंगोले, मनोरा तालुकाध्यक्ष प्रदिप घोडे, मंगरूळपीर तालुका अध्यक्ष प्रदीप राठोड, युवक जिल्हा उपाध्यक्ष रवी जाधव, रिसोड युवक तालुकाध्यक्ष अमोल बाजड, रिसोड शहराध्यक्ष विकास झुंगरे, रिसोड तालुका संघटक राहुल डांगे, तालुका उपाध्यक्ष विष्णू सरकटे व सेनगाव तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत व तसेच भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष राम पाटील बोरकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED