समतेच्या सैन्याला नैतिक बळ देणारे वंचितांचा बुलंद आवाज- आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

47

🔹31 डिसेंबर रोजी पंढरपूर मंदिर प्रवेश आंदोलनाचे निमित्ताने विशेष लेख

हुकुमशाही वृत्तीच्या शासनकर्त्यांनी, मिडियाला हाताशी धरुन समाज मनात कोविड-१९ च्या सबबीखाली प्रचंड भिती निर्माण केली.अनेक चित्रफिती दाखवून रात्रंदिवस कोरोना कोरोनाचा मारा करीत आणि सर्वच आकडे एकत्र करून देशावर कसे महामारीचे संकट आले असा आभास निर्माण केला…!!
इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि प्रिंट मिडियाच्या माध्यमातून जनतेच्या मनात भय पेरण्याची प्रक्रिया यशस्वी झाली.परिणामी भारतीय समाज भयग्रस्त झाला….!!
भयग्रस्त समाजावर कुठलेही निर्बंध सहज लादता येतात म्हणून देशात महामारी नसतांनाही अमर्याद लॉकडाऊन चा प्रयोग शासनकर्ते करु लागले…!!
लॉकडाऊन हा कोविद-१९ वरील ऊपाय नाही हे अनुभवाने सिद्ध झाले आहे…!!
एका बाजूने देशातील सर्वच क्षेत्राचे खाजगीकरण करणे सुरू आहे…!!
सर्वच उद्योगधंदे बंद असल्यामुळे आर्थिक मंदी आली आहे…!!
या अघोषित आणिबाणीमुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे…!!
कुणाचे व्यवसाय बंद झाले, कुणाचं पोटभरण्याचं साधनं बंद पडलं,कुणाचा धंदा बसला,कुणाची नोकरी गेली,कुणी कुणी तर पोट भरायला सुद्धा महाग झालं…!!
अनेकांच्या अनेक अडचणी मात्र राष्ट्रात कल्याणकारी राज्याची संकल्पना असलेल्या लोकशाहीत शासन नावाची संस्था काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही…!!
अशावेळी लोकशाहीवादी नेतृत्व स्वस्थ बसूच शकतं नाही…!!
राष्ट्रवादी विचाराचा नेता घरात बसून हे कुटील षढयंत्र सहन करुच शकत नाही. देश रसातळाला जातांना स्वस्थ बसणे कसे शक्य आहे…??
म्हणून….
इतर सर्व पक्ष आणि नेते घरात बसलेले असतांना वयाची सत्तरी गाठणा-या अॅड बाळासाहेब आंबेडकरांनी या हुकुमशाहीच्या विरोधात एल्गार पुकारला आहे…!!
हातावर पोट असलेल्या गरीबांसाठी पायपीट करीत महाराष्ट्रभर दौरे काढून बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या प्रश्नावर रान उठविले, शासनाला जाब विचारला आणि प्रसंगी आंदोलन उभे केले…!!
त्यामुळे
सलुनची दुकाने सुरू झाली…!!
हॉटेल सुरू झाले….!!
पानटप-या सुरू झाल्या…!!
जीम सुरू झाले…!!
एस.टी.बसेस सुरू झाल्या…!!
मंदिरे सुरू करावी.ही त्याच कडीतील एक मागणी आहे…!!
ऊद्या शाळा सुरू कराव्या ही सुद्धा मागणी होईलच…!!
🔹बंद पडलेलं आपलं महाराष्ट्र राज्य पुर्वपदावर आणायचं आहे…!!
🔸समाजाच्या मनातील भिती दुर करायची आहे…!!
🔹बंद पडलेल्या चुली पेटवायच्या आहेत…!!
🔸बंद पडलेलं अर्थचक्र फिरवायचं आहे…!!
🔹प्रत्येक नागरिकाला त्याचं मन प्रसन्न आणि भयमुक्त होण्यासाठी त्याच्या त्याच्या श्रद्धा स्थानी मोकळेपणाने जाऊ द्या…!!
🔸तरुणाला त्याच्या ऊज्वल भविष्यासाठी शिक्षण घेऊ द्या…!!
🔹भयग्रस्त समाजाच्या मनात आंदोलनाच्या माध्यमातून हिम्मत ऊभी राहीली पाहिजे हाही ऊदात्त आणि मानवतावादी दृष्टिकोन आहे…!!
🔸समतेच्या सैन्याला नैतिक बळ देण्याचं महानतम कार्य या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वमान्य नेते बाळासाहेब आंबेडकर करीत आहेत…!!
इथला तरुण रस्त्यावर उतरून मागणी करण्याचं धैर्य दाखवू लागला आहे…!!
दोन महिन्या अगोदरची परिस्थिती आठवा…!!
तरुणांना रस्त्यावर पोलिस कसे हिरवे पिवळे होईस्तोवर मारतं होते आणि त्याचे व्हिडिओ प्रसारीत करुन इतरांच्या मनात कशी दहशत निर्माण केली जात होती…!!
तोच मार खाणारा तरुण आज आपल्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतो आहे,डफली वाजवितो आहे, निवेदन देतो आहे, पोलिस स्टेशनमध्ये जातो आहे.,ही मोठी उपलब्धी आहे….!!
आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी लढण्याचं बळ समाज मनात पेरण्याची प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी ….
_चलो पंढरपूर…!!
चलो पंढरपूर…!!
चलो पंढरपूर….!!

                                                                   🙏जयभीम

✒️लेखक:-प्रा.भास्कर भोजने 
( राजकीय विश्लेषक, विचारवंत, जेष्ठ मार्गदर्शक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार) अकोला जिल्हा मो-99602 41375

▪️ संकलन:-नवनाथ पौळ
केज तालुका प्रतिनिधी
मो:-8080942185