श्री.अंबादेवी मंदिरासमोर भाजपचे डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृवात घंटानाद आंदोलन

13

🔸दार उघड उद्धवा, दार उघड

✒️वरुड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरुड(दि 29ऑगस्ट):-२२ मार्च पासून कोरोनाच्या लॉकडॉउनमुळे देशातील संपूर्ण व्यवसाय व धार्मिक स्थळे बंद होते परंतु कालांतराने केंद्र सरकारने सर्व धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी दिली असतानाही राज्य सरकारने धार्मिक स्थळे उघडण्यासाठी मनाई केली आहे. त्यामुळेच आज राज्यभर भारतीय जनता पक्ष व विविध संघटनाही ह्यात सहभाग घेतला होता. भारतीय जनता पार्टीचा ह्या राज्यव्यापी “घंटानाद” आंदोलन चा भाग म्हणुन भाजपा अमरावती शहर जिल्हा चा वतीने भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे व आ. रणजीत पाटील यांच्या नेतृत्वात ऐतिहासीक ,पुरातन अंबादेवी मंदिरा समोर मंदिरांचे दारे भक्तांना खुले करावे या साठी “घंटानाद” आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाने दारु ची दुकाने, मटनाची दुकाने, माॅल ईत्यादी सर्व करण्यास परवानगी देते पण महाअाघाडी सरकार जनतेचा भावनांची अवहेलना करुन महाराष्ट्रात फक्त मंदिरांची दारे बंद ठेवते. या विरुध्द हे आंदोलन करण्यात येत आहे. “उध्दवा दार उघड, मंदिराची दारे उघड” अशा घोषणा देत घंटा,नगारे, वाजवत लोकभावना शासना पर्यत पोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत अाहे असे सांगीतले. या घंटानाद अांदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला .या प्रसंगी प्रामुख्याने प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी,महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुमताई साहु, जेष्टनेते राविभाऊ खांडेकर, जयंतराव डेहणकर,स्थाई समिती सभापती राधाताई कुरील, महामंत्री गजानन देशमुख, मंगेश खोंडे, दिपक खताडे,उपाध्यक्ष संजय तिरथकर,डाॅ.प्रणय कुळकर्णी,धिरज बारबुद्भे, सचिव-राजेंद्र लिखीतकर,किशोरभाऊ जाधव,वनमाला सोनोने, पद्मजाताई कौदण्य, नगरसेवक-सुनंदाताई खरड,अजय सारस्कर,स्वातीताई कुळकर्णी,ईंदुताई सावरकर, वंदनाताई मडघे,सुरेंद्र बुरंगे, महिला मोर्चा अध्यक्ष लताताई देशमुख, युवा मोर्चा अध्यक्ष प्रणित सोनी,ओ बी सी मोर्चा अध्यक्ष विवेक चुटके,सोशल मेडिया प्रमुख दिपक पोहेकर,अभ्यात्मिक अाघाडीचे राहुल वाठोडकर, शेतकरी अाघाडी अध्यक्ष शालिकराम नांदणे, मंडल अध्यक्ष- राजेश गोयंका,राजेंद्र मेटे,जगदिश कांबे,मंडल सरचिटनीस मनोज काळे,अतुल तिरथकर,अाषिश अतकरे, मंडल युवा मोर्चा अध्यक्ष -अमोल थोरात,कार्तीक सामदेकर,अखिलेश राजपुत,मंडल महिला मोर्चा अध्यक्ष -किर्तीताई अाकोलकर,हेमाताई श्रिवास,सतनामकौर हुडा,पुजा बत्रा,ममता चौधरी. सागर महल्ले,विशाल डहाके, ऊन्नती शालिग्राम, सविता भागवत सह शेकडो कर्यकर्त्यांचा सहभागी झाले .