गेल्या 24 तासात जिल्ह्यात कोरोनामुळे दोन मृत्यू

    42

    ?चंद्रपूर जिल्ह्यात (दि.29ऑगस्ट) – सायंकाळी 7.15 वाजेपर्यंत 178 कोरोना बाधीत

    ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चंद्रपूर(दि.29ऑगस्ट):- जिल्ह्यात गेल्या 24 तासात दोन कोरोना बधितांचा मृत्यू  झाला.यात नेताजी चौक,विजासन रोड, भद्रावती येथील 70 वर्षीय महिला बाधिताला 19 ऑगस्टला चंद्रपूर येथे भर्ती करण्यात आले होते. तिचा 28 ऑगस्टला सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज 29 ऑगस्टचा पहाटे 2.30 वाजता 49 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्याला कोरोना व्यतिरिक्त निमोनिया चा आजार होता.

    आज (दि.29ऑगस्ट)रोजी गेल्या 24 तासात सायंकाळी 6 वाजेपर्यंत  नवीन 178 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आता पर्यंत 2074 बाधितांची संख्या झाली आहे.