बंद असलेली सर्व प्रार्थना मंदिरे तत्काळ चालु करण्याची मागणी

    38

    ?भाजपाचे माजी जालना तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शेजुळ यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन

    ✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

    जालना(दि.29ऑगस्ट):-कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बंद असलेली सर्व प्रार्थना मंदिरे भाविकांसाठी तात्काळ चालु करण्यात यावीत म्हणुन आज जालना तालुक्यातील सेवली येथे राज्यसरकारच्या विरोधात दार उघड उद्धवा दार उघड म्हणत घंटानाद आंदोलन करण्यात आले.सदरील आंदोलन सेवली येथील हनुमान मंदिरा समोर करण्यात आले.यावेळी जालना तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर शेजुळ यांनी राज्य सरकारवर सडकुन टिका केली व बंद असलेली सर्व प्रार्थना मंदिरे भाविकांसाठी तात्काळ खुली करण्याची मागणी केली.

    यावेळी भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ.जिजाबाई जाधव, सेवलीचे माजी सरपंच श्री कोमलशेठ कुचेरिया, चेअरमन दिलीपराव जोशी, ग्रा.पं.सदस्य शिवराज तळेकर, वैजिनाथआप्पा तळेकर,अशोकशेठ साकला,अतुल सेवलीकर,महेश राजमुळे,तानाजी राऊत यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.