सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यसनाची निर्मिती विचाराधिन – ना.धनंजय मुंडे

28

✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

मुंबई/परळी(दि.29ऑगस्ट):-सफाई कामगारांच्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागात स्वतंत्र कार्य शासनाची निर्मिती विचाराधीन असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले सफाई कामगारांच्या मागण्या संदर्भात मंत्रालयात आयोजिक बैठकीत श्री मुंडे बोलत होते.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडे समाज कल्याण आयुक्त प्रवीण दराडे सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश डींगळे सफाई कामगार संघटनेचे गोविंद्भाई परमार विविध सफाई कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण सार्वजनिक आरोग्य नगर विभागाचे अधिकारी उपस्थित होते श्री मुंडे म्हणाले सफाई कामगाराच्या बाबतच्या लाड पागे समितीच्या अहवाल व सदस्य स्थिती यांच्या समन्वय साधून योग्य निर्णय घेतला जाईल कामगारांच्या निवारणाच्या प्रश्न सोडविण्यासाठी विभागामार्फत विशेष प्रयत्न केले.

जातील सफाई कामगाराच्या वारसाहक्क नियुक्ती देण्यासंदर्भात प्रधान यांनी विचार करणार नियुक्तीबाबत शैक्षणिक अहर्ता बाब तपासणार सफाई कामगारांच्या सामाजिक आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सतत प्रयत्न करणार असल्याचे श्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.