
✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587
हिंगोली(दि.29ऑगस्ट):- बेलुरा गुट्टे ता. जि.हिंगोली येथे जय भगवान महासंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास खूप मोठ्या संख्येने गावातील युवकांनी सहभाग नोंदवला व रक्तदान केले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित जय भगवान महासंघ जिल्हाध्यक्ष विलासराव आघाव, सरपंच गंगाधरराव गुट्टे, ऑटो महासंघाचे जिल्हाप्रमुख भगवान बांगर, जिल्हा संघटक प्रेम नागरे, पंकज होडगिर, पोलीस पाटील प्रशांत गुट्टे, युवा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख वैभव गुट्टे,अनिल गुट्टे, युवा जिल्हा सचिव वैभव आघाव, तालुका सचिव अनिल सानप व इतर पदाधिकारी आणि गावातील नागरिक तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.