✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.३०ऑगस्ट):-गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे सोडले असल्याने वैनगंगा नदीच्या काठी असलेल्या सर्व गावामध्ये पाणी घुसला आहे. आणि अस बजावण्यात येत आहे की, १९९४ च्या पुरापेक्ष्याही हा जोराचा पूर येऊ शकतो. तरी पण हा पुराचा वेग बगता शासनाने दक्षता कक्ष पाठवलेले नाही. ह्या सर्व बाबी लक्षात घेता शासनाने लवकरात लवकर नदीकाठच्या गावांना दक्षता कक्ष पाठवावे.
आज सकाळ पासून पूर अर्हेरनवरगाव, पिंपळगाव (भोसले), बेळगाव – कोल्हरी, लालज, सावळगव, चिचोली,सोंद्री,खरकडा(पिंपळगाव), ई. व नदी जवळील सर्व गावातील घरामध्ये पूर घरात घुसून लोक घराच्या बाहेर रस्त्यावर आलेले आहेत. तरी शासनाने तातडीने खबरदारी घ्यावी.

महाराष्ट्र, विदर्भ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED