अखेर त्या तरूणाचा उपचारा दरम्यान मृत्यु

    46

    ✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी) मो:-9307896949

    नायगाव(दि.30ऑगस्ट):-फ्रिज मधील कुलींगच्या टाकीच्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या त्या युवकाचा अखेर काल 29 आॅगस्ट रोजी सायंकाळी 5 वा. डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय दवाखाना विष्णुपुरी , नांदेड येथील उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.
    त्या मृतक व्यक्तीचे नाव मारोती तानाजी देवदे होते व ते मोदी बाळू या नावाने प्रचलित होते. काल म्हणजेच शनिवारी रात्रि 12 वा. कुंटूर येथील स्मशान भुमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले . सदरील घटनेमुळे कुंटूर व परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.