तीर्थपुरी येथील एसबीआय बँकेत शेतकऱ्याला लाठ्या काठ्यानी मारहाण

  38

  ? काही स्थानिक नेत्याची तक्रार मागे घेण्यासाठी शेतकऱ्यास दमदाटी

  ? शाखेत वाढला दलालाचा हस्तक्षेप

  ✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

  जालना(दि.30ऑगस्ट):-घनासावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे भारतीय स्टेट बँक मध्ये पैसे काढण्यासाठी रांगेत असलेल्या शेतकऱ्याला कंत्राटी कर्मचाऱ्याने कोणतेही कारण नसताना विनाकारण मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस चौकीत तक्रार देण्यात आली आहे.या तक्रारीत शेतकरी ग्राहक भिमराव हरिभाऊ
  कांबळे यांनी म्हटले आहे की, आपण तीर्थपुरी येथील एसबीआय बँकेच्या शाखेत पैसेबकाढण्यासाठी गेलो होतो. दुपारी १२ वाजेपासून रांगेत उभा होतो.

  तोंडाला मास्क लावलेले होते. दुपारी बँकेची जेवणाची सुटी
  झाल्यामुळे नंबरच्या रांगेत बसून होतो. कामकाज सुरु होताच कंत्राटी कर्मचारी दुर्गेश राऊत यांनी हातात काठी घेतली आणि आपल्या पायावर अनेकवेळा वार केले.त्यात मोठी दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणत मुका मारही बसलेला आहे.

  दरम्यान, या शाखेतील मनमानी कारभार, दलालचा हस्तक्षेप वाढला आहे.यावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही.सदरील प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी पुरोगामी संदेश न्यूजच्या वतीने बँक व्यवस्थापकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही.
  शेतकऱ्याशी संपर्क साधून घडलेल्या गैरपद्धतीने मारहाण प्रकाराबद्दल विचारणा केली असता बँक व्यवस्थापनाने मारहाणीत जखमी झाल्यानंतर कोणताही प्राथमिक उपचार केला नसल्याचे सागितले.प्रत्येक आस्थापनामध्ये प्राथमिक उपचार पेटी असते ती नुसती शोभेसाठी ठेवण्यात आलेली होती का असा सवाल उपस्थित होत आहे.तसेच कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी नेले नाही असंही सांगण्यात आले.

  शेतकऱ्याशी घडलेल्या प्रकाराबद्दल सविस्तरपणे जाणून घेण्यात आले त्यावेळी नांव न सांगण्याच्या अटीवर असं सांगण्यात आले की काही स्थानिक राजकीय नेते माझ्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाब आणत आहेत.व तक्रार मागे घेण्यासाठी सांगत आहेत.घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असून संबंधितांवर कडक करवाई करावी व दलालांचा वाढवलेला हस्तक्षेप बंद करण्यात यावा,सर्वसामान्य ग्राहक, शेतकरी यांना योग्य चांगली वागणूक देण्यात यावी अशी मागणी परिसरातील बँकेचा सर्वसामान्य ग्राहकवर्ग करत आहे.