🔹उद्धवा अजब तुझे सरकार -खुले करा हरि द्वार : सरपंच अमोल तिपाले

✒️गोपाल भैया चव्हाण(बीड प्रतिनिधी)मो:-9665667764

बिड(दि.30ऑगस्ट):-गेवराई तालुक्यातील हिरापुर येथे लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे व प्रदेश उपाध्यक्षा खा.डॉ. प्रितमताई मुंडे मा. आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मंदिरे खुली करावी या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्या साठी घंटानाद आंदोलन करण्यात आले आहेत.

सविस्तर असे की ,भाजपाच्या वतीने दि 29 / 8 /2020 रोजी सर्वञ घटानाद आंदोलन करण्यात आले बीङ जिल्हात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील मंदिर खुली करण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी गेवराई तालुक्यातील
हिरापुर येथील हनुमान मंदिरासमोर सरपंच अमोल तिपाले . मा. सरपंच संतोष काळे. सुरेश काका लाखे. महादेव मुंजाळ. रामेश्वर मुंजाळ. भगवान पवार. जिवन काळे. सुरेश काळे. नागोराव मुंजाळ. घटानाद आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते.

बीड, महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED