राज्यस्तरीय अष्टाक्षरी चारोळी स्पर्धेचा निकाल जाहीर

29

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.30ऑगस्ट):-सावली प्रकाशन समुहाच्या वतीने श्रावणी सोमवार निमित्ताने हरहर महादेव या विषयावर अष्टाक्षरी चारोळी स्पर्धा घेण्यात आली होती यामधे राज्यातुन १७३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यामधे सर्वोत्कृष्ट सुचित्रा कुंचमवार, अनिता गुजर, उत्कृष्ट प्रकाश फर्डे,नीरज आत्राम,प्रथम काव्यरत्न प्रा. रावसाहेब राशिनकर(साहेब), कल्पना अंबुलकर, स्मिता डी, माणिकराव गोडसे, द्वितीय संध्याराणी कोल्हे,पुर्वा चौधरी,रा.ग.आडकर,गया गवळी,त्रुतिय रामहरी पंडीत,लीलाधर दवंडे, शर्मिला पाटोळे,अवीनाश भोईर यांच्यासह लक्षवेधी उत्तेजनार्थ क्रमांकांना ऑनलाइन सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले या सर्व चारोळ्यांचे.परिक्षण सावली प्रकाशन समुह संस्थापक सचिन पाटील यांनी निरपेक्ष केले सावली प्रकाशन समुह गेल्या सहा महिन्यांपासून अनेक साहित्यिक उपक्रम राबवत असून अनेक साहित्यिक या स्पर्धेत सहभागी होत आहेत अशी माहिती समूह संस्थापक सचिन पाटील यांनी दिली.