✒️ देवराज कोळे(गेवराई, प्रतिनिधी)मो:-8432409595

गेवराई(दि.30ऑगस्ट):-पंढरपूर येथे होत असलेल्या वारकरी अंदोलनात हजारोंच्या संख्याने जाण्यासाठी वारकरी संप्रदायाने लॉकडाऊन विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे .कोरोना संक्रमणामुळे गेल्या पाच महिन्यापासून बंद असलेले विठ्ठल रूख्मीणी मंदिर भाविकांसाठी खुली करण्यासाठी दि.३१ अॉगस्ट रोजी विश्व वारकरी सेनेन एक लाख वारकऱ्यांसोबत मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करणार आहेत.या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर करणार आहेत. मराठवाड्यातून हजारोच्या संख्येने वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत, मंदिर भक्तांसाठी फुल्ल करावं या आंदोलनात आपण हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भारीप बहुजन महासंघाचे मा.तालुका अध्यक्ष अजयकुमार गायकवाड यांनी केले आहे.

कोरोना संसर्गजन्य रोगामुळे गेल्या पाच महिन्यापासून देशासह राज्यात टाळेबंदी सुरू आहे याचा फटका सर्वांना बसला आहे.राज्यात मिशन बिगिन अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले असेल तरी धार्मिक स्थळांना आणि सण-उत्सवांना तितकासा दिलासा मिळाला नाही. यंदा आषाढीवारी प्रतिकात्मकरित्या साजरी करण्यात आली आषाढी याञेदिवशी पंढरपुरात वारकऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. शिवाय भजन किर्तनालाही मनाई करण्यात आलेली आहे. या सगळ्याच मुद्यावरून वारकरी संप्रदाय नाराज आहे. या नाराजीच्या स्फोट म्हणून वारकऱ्यांनी एक लाख वारकरी घेऊन पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात प्रवेश करणार आहेत.

या वारकऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या पाठींबा मिळाल्याने वारकऱ्यांच्या लढ्याला अधिकच बळ मिळाले.त्यामुळे विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष ह.भ.प.गणेश महाराज शेटे व विश्व वारकरी सेनेचे उपाध्यक्ष ह.भ.प. जगन्नाथ महाराज तसेच इतर वारकरी संंघटनानी येत्या ३१ अॉगस्ट सोमवार रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक लाख वारकऱ्यांन्या सोबत घेऊन मंदिर प्रवेश करणार आहे.तरी मराठवाड्यातील सर्व वारकऱ्यांनी भजनी मंडळानी तसेच पायीवारी करणाऱ्यानी व सर्व भाविक भक्तांनी या आंदोलनास पंढरपूर येथे उपस्थित रहावे असे आवाहन अजयकुमार गायकवाड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकातून केले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED