कोरोना आजारामुळे एकाचा मृत्यू -चंद्रपूर जिल्ह्यात आजपर्यंत 26 मृत्यूची नोंद

    42

    ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चंद्रपूर(दि.30ऑगस्ट):-जिल्ह्यात मूल तालुक्यातील नवेगाव येथील 76 वर्षीय कोरोना बाधिताचा दि.29ऑगस्ट च्या रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला. त्याला 21 ऑगस्टला भरती करण्यात आले होते.

    जिल्ह्यात आज पर्यंत 26 मृत्यूची नोंद झाली आहे. आज 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.15 वाजेपर्यत 270 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. बातमी लिहेपर्यत चंद्रपूर जिल्ह्यातील आज पर्यंतची बाधितांची संख्या 2344 झाली आहे.

    आजचे कोरोना बाबतचे सविस्तर वृत्त काही तासातच देण्यात येईल.