कोसंबी (गवळी) येथे नवनिर्मित ग्रामपंचायत भवनासह R.O वॉटर मशीनचे लोकार्पण

110

🔸खासदार अशोक नेते व जि.प.अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले यांची उपस्थिती

🔹जि.प. शाळा सौंदर्यीकरणासह जल मंदिराचे उद्घाटन

✒️नागभीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागभीड(दि.30ऑगस्ट):-ग्रामपंचायत भवन हे लोकशाहीचे मंदिर असुन या ठिकाणी बसलेल्या पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना प्रामाणिकपणे व सत्य न्याय देत गावविकासाचा गाडा हाकावा अशी अपेक्षा गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकभाऊ नेते यांनी नागभीड तालुक्यातील कोसंबी गवळी येथील नवनिर्मित ग्रामपंचायत वास्तुचे लोकार्पण प्रसंगी व्यक्त केले व या परीसरातील बहुप्रतिक्षित नागभीड – नागपूर ब्राँडगेज रेल्वेमार्गाचे प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होत असल्याचे सांगितले.

नागभीड तालुक्यातील कोसंबी (गवळी) येथे नवनिर्मित ग्रामपंचायत भवनाच्या इमारतीसह नव्याने बसविण्यात आलेल्या R.O मशीनचे लोकार्पण आणि शाळा सौंदर्यीकरण व जलमंदिराचे (विहिरी) उद्घाटन चंद्रपुर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले यांचे शुभहस्ते व या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार श्री. अशोक नेते यांचे अध्यक्षतेखाली आज संपन्न झाले. याप्रसंगी बोलतांना सौ.संध्याताई गुरनले यांनी या क्षेत्राचे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांचे कौतुक करीत सदैव आपल्या क्षेत्राच्या विकासाचे काळजीपुर्वक नियोजन करुन विकासकामे खेचून आणणारा व प्रत्येक विभागाचा निधी आपल्या क्षेत्रात वळविणारा सक्षम लोकप्रतिनिधी असल्याचे प्रतिपादन केले.

कोसंबी गवळी या आदिवासी गावासाठी जिल्हापरिषदेच्या माध्यमातून एक बोअरवेल व जि.प.शाळेच्या सौंदर्यीकरणासाठी पन्नास हजार रुपयांच्या निधीची घोषणा यावेळी त्यांनी केली. यावेळी जि.प.उपाध्यक्षा व नागभीड पं.स.च्या प्रभारी सभापती सौ.रेखाताई कारेकर , जि.प.सदस्य संजय गजपुरे व पं.स.सदस्य संतोष रडके यांचेही समयोचित मार्गदर्शन झाले.

पारडी-मिंडाळा- बाळापुर क्षेत्राचे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी मंजुर केलेल्या जनसुविधेच्या प्राप्त निधीतून कोसंबी येथे ग्रामपंचायतीची नवीन इमारत बांधण्यात आली. तसेच जिल्हा निधीतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सौंदर्यीकरण तर समाजकल्याण निधीचे सदुपयोग करत स्थानिक वार्ड क्र. ०२ मध्ये विहिरीचे (जलमंदिर) बांधकाम करण्यात आले. यासोबतचं स्मार्ट ग्राम निधी अंतर्गत मिळालेल्या निधीतून R.O वॉटर मशीन बसविण्यात आली होती. या सर्व नवीन कामांचे लोकार्पण तथा उद्घाटन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री. अशोक नेते व जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांच्या शुभहस्ते आज पार पडले.

यावेळी जि. प. उपाध्यक्षा सौ. रेखाताई कारेकर, जि. प. सदस्य संजयभाऊ गजपुरे, पं. स. सदस्य संतोष रडके, सरपंच मच्छिंद्र चन्नोडे, माजी सरपंचा सौ. रंजुताई गायकवाड, भाजपाचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर पाटील ठिकरे , कृऊबास उपसभापती रमेश पाटील बोरकर , संचालक धनराजजी ढोक व आनंद कोरे , ग्रा.पं. सदस्या सौ. अस्मिता दडमल, पं.स.चे माजी उपसभापती दयारामजी कन्नाके, गडचिरोलीचे प्रकाशजी गेडाम , डॅा.भारत खटी , जि.प.बांधकाम चे उपविभागीय अभियंता बांगडे साहेब , धनराज बावणकर , आदींसह गावकरी मंडळी , शिक्षकवृंद उपस्थित होते.

समारोहाच्या सुरुवातीला गावाच्या सीमेवरील श्री वाल्मिकी ऋषी मंदिरात मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. याप्रसंगी येथुन नुकतेच बदलुन गेलेले ग्रामसेवक प्रदिप तलमले यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. तसेच गावातून इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेली कु.श्रुतिका सदानंद पिलारे या विद्यार्थिनीचा जि.प.अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन सदानंद पिलारे यांनी केले तर आभार ग्रामसेवक रंजित नंदेश्वर यांनी मानले.