✒️नितीन रामटेके(गोंडपीपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634

गोंडपिपरी(दि.31ऑगस्ट):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने
क्रियाशील कार्यकर्त्यांची सभा आज दिनांक 30 ऑगस्ट 2020 रोजी कला वाणिज्य महाविद्यालय गोंडपिपरी येथे आयोजित केली होती. राजेंद्र वैद्य अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस चंद्रपूर यांनी सक्रिय कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने युवक, प्रौढ, वर्गानी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीत यावे आणि पक्ष संघटन वाढवावे असे सांगत , कार्यकर्त्याना मार्गदर्शन व पक्ष संघटन वाढविण्याच्या सूचना सुद्धा करण्यात आल्या.

आणि गोंडपीपरी राष्ट्रवादी सेवादल च्या अध्यक्ष पदी एकनाथ कुकुडकर यांची नियुक्ती करण्यात आली
सदर आढावा सभा नितीन भाऊ मेश्राम अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग गोंडपीपरी यांच्या नेतृत्वात घेण्यात आली. यावेळी गोंडपीपरी तालुका निरीक्षक शरद मानकर , सेवाद्दल जिल्हा अध्यक्ष महादेव पिदूरकर , आणि गोंडपीपरी तालुक्याचे माजी तालुका अध्यक्ष वाघ मामा तसेच मार्गदर्शक अरुणजी वासमवार युवक राजुरा विधानसभा अध्यक्ष कुणाल गायकवाड आणि ओबीसी सेल चे तालुका अध्यक्ष कुळे सर मीडिया सेल चे अध्यक्ष मुंजमकर , आणि सामाजिक न्याय विभागाचे उपाअध्यक्ष प्रमोद दुर्गे , सहित अन्य कार्यकर्ते उपतिथ झाले होते.

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED