आम्ही तुकारामाचे पाईक,
आम्हा नाही सोयरसुतक ढोंग्यांचे,
देव शोधतो माणसात.
देवळात काय पसारा शोधावा कातळाचा।।

भोळीभाबडी जनता भोळीच राहते,
ढोंग्यांच्या ढोंगीपणास भुलते.
पाषाणापुढे मस्तच गहान ठेवते,
ऐसें माणसास शिकवायचा कोण शहाणपणा ।।

आजारी महामारीत दवाखान्यात जाती,
बरे झाल्यास म्हणते देवाची कृपा,
ज्याचा नैवद्यही माणूस बनवती
त्याची कसेल बरी कृपा अन् अवकृपा।।

माणसाने बसवला बाजार देवळाचा
धंदा वाढवला भितीचा
बापुडा देव तो माणसाच्या हाताचे खेळणं झाला
एका माणसाहातून दुसऱ्यास लुटायला देवनाव झाला।।

संत, महापुरुष सांगुनी गेले,
बुवाबाजी ,श्रद्धा अंधश्रद्धेचा खेळ सोडा.
माणसात देव शोधा, कर्मात देव शोधा.
बाजार उठेल, भितीचा बाजार करणाऱ्यांचा।।

✒️कवी:-सतिश यानभुरे
शिक्षक –खेड ,पुणे,
मो:-८६०५४५२२७२

▪️संकलन
नवनाथ पौळ
केज तालुका प्रतिनिधी
मो:-8080942185

पुणे, महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED