राष्ट्रवादी काँग्रेस मधून सुरेश वाघमारेंचा भीम आर्मी मध्ये जाहीर प्रवेश

9

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.31ऑगस्ट):-उत्तर मुंबई मध्ये आंदोलन मोर्चे घेऊन शोषित पीडिता वर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरुद्ध लढाई लढणारे युवा नेतृत्व सुरेश वाघमारे यांनी आपल्या समाजातील लोकांचे सत्तेत राहून कामे करता येतील या उदात्त हेतूने धर्मनिरपेक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेने चे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष पद सोडून समाजहित जोपासण्यासाठी वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश घेतला होता मालाड तालुका युवक अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत असताना रोज दलित अत्याचार च्या घटना बघून मनात विद्रोह पेटला कुठलेहीसरकार असो दलिताना न्याय मिळत नाही ही वास्तविकता पटल्यामुळे आम्हाला रस्त्यावर ची लढाई शिवाय पर्याय नाही अशी भूमिका घेत सुरेश वाघमारे नि युवकांच्या मनात ताईत झालेले नव्याने उदयास आलेले नेतृत्व भाई चंद्रशेखर आजाद उर्फ रावण यांच्या कार्यास प्रभावित होऊन राष्ट्रवादी सोडत महाराष्ट्र प्रमुख नेहाताई शिंदे व मुंबई प्रमुख दीपक भाऊ हनवते यांच्या प्रमुख उपस्थितीत मीरा भाईंदर येथील गणेश नगर या ठिकाणी पदनियुक्ती च्या कार्यक्रमात जाहीर प्रवेश केला यावेळी त्याच्या सोबत कैलास आखाडे व अन्य कार्यकर्ते नि प्रवेश घेतला असून लवकरच मालाड विभागात सभा लावून इतर समर्थक जाहीर प्रवेश करतील.

असे वर्तमान पत्रा च्या प्रतिनिधि शी बोलताना वाघमारे नी सांगितले यावेळी सदर कार्यक्रमास दीपक जगदेव .उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष विजय बनसोडे.जिल्हा उपाध्यक्ष .विस्वास मोरे .प्रियांका वाघमारे. मीरा भाईंदर विधानसभा 1 4 5अध्यक्ष सूचित जैस्वार सचिव संदीप प्रजापती .गणेश देव नगर वॉर्ड अध्यक्ष सर्वेश राव उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष दीपक जगदेव आदी सह शेकडो महिला पुरुष भीम आर्मी भारत एकता मिशन चे कार्यकर्ते उपस्थित होते.